शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ठरला अखेरचा शनिवार गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 21:49 IST

शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २९ फेब्रुवारीपासून आठवड्यात पाचच दिवस काम करायचे आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर निर्णय घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. या निर्णयानुसार १५ फेब्रुवारीचा शनिवार शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अखेरचा शनिवार ठरला.

ठळक मुद्देपाच दिवसाच्या कामकाजामुळे कर्मचारी खूश : शासनाच्या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकडून स्वागत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासकीय व निमशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना २९ फेब्रुवारीपासून आठवड्यात पाचच दिवस काम करायचे आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर निर्णय घेऊन शासकीय कर्मचाऱ्यांना खूश केले आहे. या निर्णयानुसार १५ फेब्रुवारीचा शनिवार शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अखेरचा शनिवार ठरला. शासकीय कर्मचाऱ्यांनीही अखेरच्या शनिवारी आनंदात काम केले आणि सायंकाळी कामकाज संपल्यानंतर शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले.२९ फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू होत असला तरी, १५ फेब्रुवारीचा शनिवार हा या महिन्यातील तिसरा शनिवार होता. या निर्णयापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुटी असल्याने कामकाजाचा हा अखेरचा शनिवार ठरला. यापुढे कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात शनिवार हा दिवस कधीही कामकाजाचा दिवस म्हणून येणार नाही. पण यातून ज्या सरकारी कार्यालयांना कारखाना कायदा किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक आहे त्यांना या शासन निर्णयाचा लाभ मिळणार नाही.नागपूर जिल्ह्यात राज्य शासनाची २८८ कार्यालये आहे. शहरात बहुतांश कार्यालये सिव्हील लाईन्स परिसरात आहे. एरवी सहा दिवस येथे वर्दळ असायची, पण आता आठवड्यात दोन दिवस या परिसरात शुकशुकाट राहणार आहे. राज्य शासनाचे ३० ते ३५ टक्के कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. २५ ते ३० टक्के कर्मचारी ४० ते ५० वयोगटात आहे. शासनाने २०१२ नंतर मोठ्या प्रमाणात भरतीला ब्रेक लावल्याने, शासकीय कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे. अतिरिक्त कामांचा भार कर्मचाऱ्यांवर वाढला आहे. त्यामुळे शासनाने दिलेली दोन दिवसाची सुटी योग्य असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. यापूर्वीही झाला होता ५ दिवसाचा आठवडाविशेष म्हणजे महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे ६ दिवस ठरविण्यात आले होते. तेव्हा १०.३० ते ५.३० अशी कामाची वेळ होती. परंतु सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना ५ दिवसाचा आठवडा करण्यात आला होता. जवळपास ६ महिने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवसाच्या सुट्याही मिळाल्या होत्या. परंतु हा निर्णय मागे घेऊन दुसरा आणि चौथा शनिवार सुटी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यत वाढविण्यात आली होती. आता परत २९ फेब्रुवारीपासून कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहणार आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारी