शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अंतिम संधी, आता तरी पास व्हा

By निशांत वानखेडे | Updated: August 2, 2025 20:04 IST

विद्यापीठाच्या विद्वत परिषदेची ‘कॅरी ऑन’ ला मान्यता : विद्यार्थ्यांच्या आंदाेलनाला यश

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गेल्या महिनाभरापासून विद्यापीठाच्या वर्तुळात गाजत असलेल्या ‘कॅरी ऑन’च्या विषयावर अखेर ताेडगा निघाला. विद्वत परिषदेने विद्यार्थ्यांच्या बाजुने १२ विरुद्ध ३ च्या मताने निर्णय देत कॅरी ऑन लागू करण्यास मान्यता दिली. मात्र ही संधी केवळ यावर्षीपुरती मिळेल, पुढच्या सत्रात कॅरी ऑन लागू राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना यावर्षी काेणत्याही परिस्थितीत उत्तीर्ण व्हावेच लागेल.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील गेल्या महिनाभरापासून विद्यार्थी ‘कॅरी ऑन’च्या मागणीसाठी आंदाेलन करीत आहेत. २०२४-२५ सत्रासाठी एटीकेटीनुसार निकष पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून विद्यापीठाने २९ ऑगस्ट २०२४ रोजी एक परिपत्रक जारी करून परीक्षेसाठी अतिरिक्त संधी दिली. मात्र, यावर्षी असे कोणतेही परिपत्रक विद्यापीठाने काढले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांसमाेर समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे वर्ष वाया जाणार असल्याची चिंता असून हजारो विद्यार्थी गेल्या महिनाभरापासून विद्यापीठात कॅरी ऑन योजनेसाठी अर्ज करत आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या विषयावर आंदाेलन करीत विद्यापीठ प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली आहेत. विद्यार्थ्यांसाेबत छत्रपती शिवाजी विद्यार्थी संघटना, एनएसयुआय व राष्ट्रवादी युवा सेना या संघटनांनीही विद्यार्थ्यांची ही मागणी लावून धरली हाेती.

दरम्यान विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने यापूर्वी ‘कॅरी ऑन’ला विराेध केला हाेता. कॅरी ऑनमुळे शैक्षणिक गुणवत्ता घसरत असल्याचे कारण देत ही मागणी अमान्य केली हाेती. मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांचे व त्यांना सहकार्य करणाऱ्या संघटनांचे आंदाेलन सुरू हाेती. यावर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डाॅ. माधवी खाेडे-चवरे यांनी विद्वत परिषदेकडे पुनर्विचारासाठी हा प्रस्ताव पाठविला.

शनिवारी कॅरी ऑनच्या विद्वत परिषदेची बैठक झाली. बैठकीदरम्यान १२ सदस्य विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ व ३ सदस्य विराेधात हाेते. ७ सदस्य तटस्थ हाेते. त्यानंतर २०२५-२६ या सत्रासाठी कॅरी ऑन लागू करणारा असल्याचे डाॅ. माधवी खाेडे यांनी जाहीर केले. मात्र ही संधी केवळ या एकाच सत्रापुरती लागू असेल. पुढच्या सत्रासाठी कॅरी ऑनची याेजना लागू राहणार नाही, असेही कुलगुरू यांनी स्पष्ट केले.

या सहा अभ्यासक्रमांना लागू नाहीकॅरी ऑनची याेजना इंजिनीअरिंग, लाॅ व पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांना लागू असेल. मात्र सहा अभ्यासक्रमांना कॅरी ऑन लागू नसेल. यामध्ये फार्मसी काॅन्सिल ऑफ इंडियाअंतर्गत असलेले बी.फार्म., एम.फार्म व शिक्षण विभागाचे बी.एड., एम.एड., एम.पी.एड. आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळणार नाही.

टॅग्स :Educationशिक्षणnagpurनागपूर