शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात टिप्परमध्ये सापडली मोठ्या प्रमाणावर अवैध दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:23 IST

धंतोली पोलिसांनी धंतोली उद्यानाजवळ असलेल्या एका टिप्परमध्ये असलेली मोठ्या प्रमाणावर अवैध दारू पकडली. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ही दारू डुप्लिकेट असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

ठळक मुद्देडुप्लिकेट दारू असल्याचा संशयअबकारी विभागाच्या मदतीने धंतोलीच्या गोदामावर धाड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धंतोली पोलिसांनी धंतोली उद्यानाजवळ असलेल्या एका टिप्परमध्ये असलेली मोठ्या प्रमाणावर अवैध दारू पकडली. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ही दारू डुप्लिकेट असल्याचा पोलिसांचा संशय आहे.दारूतस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारावर धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे यांनी पथकासह धाड टाकली. पोलिसांना धंतोली येथील बाल भारती इमारतीजवळ एक टिप्पर ( एम.एच./३१/सी/क्यू/२६२१९ ) उभा असल्याचे दिसून आला. त्यांनी टिप्परची तपासणी केली असता टिप्परमध्ये देशी दारूच्या २०० पेट्या सापडल्या. टिप्पर चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.टिप्परमध्ये जवळच्याच गोदामातून दारूच्या पेट्या ठेवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलिसांना ही दारू नकली असल्याचा संशय आहे. रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी गोदामावर धाड टाकण्याऐवजी त्यावर पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान धंतोली पोलिसांनी अबकारी विभागाला सूचना दिली. अबकारी विभागाच्या मदतीने बुधवारी दुपारी घटनास्थळाजवळच असलेल्या सम्राट एजन्सीच्या गोदामावर धाड टाकण्यात आली. पोलीस व अबकारी विभागाने गोदामाची झडती घेतली. दारूच्या दोन पेट्या, खाली बॉटल आणि झाकणे सापडली. गोदामात सापडलेली दारू हरियाणाची असल्याचे सांगितले जाते. अबकारी विभागाने दारू आणि अन्य सामान जप्त केले. गोदामाजवळच एम.एच./४०/ए/ ८५१५ क्रमांकाचे वाहन सापडले. अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहन जप्त केले आहे. तसेच गोदामात उपस्थित असलेल्या विनय जयस्वाल याला विचारपूस करण्यासाठी सोबत नेले आहे. अबकारी विभागातील सूत्रानुसार गोदामात दारूच्या खाली बॉटल, झाकणे सापडणे संशयास्पद आहे.या प्रकरणातील आरोपी हे नकली दारूचा व्यवसाय करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. नकली दारू ही हरियाणा किंवा मध्य प्रदेशातून आणली जाते. तिथे महाराष्ट्राच्या तुलनेत दारू स्वस्त आहे. ती ब्रँडेड दारूच्या बॉटलमध्ये भरून विकली जाते. ही दारू चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धेला पाठवण्यात येते. हा व्यवसाय अनेक दिवसांपासून सुरु असल्याचा संशय आहे. नागपूर दारू तस्करीचे मोठे केंद्र आहे. यात अनेक गुन्हेगार आणि पांढरपेशे सामील आहेत.ही कारवाई डीसीपी चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार दिनेश शेंडे, पीएसआय ए.के. वडतकर, पीएसआय तिवारी, कर्मचारी राजेश, पंढरी, गोपाल, मनोज आणि हेमराज यांनी केली.नवीन वर्षासाठी अवैध दारू तस्कर सज्जशहरातील अवैध दारूचे तस्कर नवीन वर्षासाठी सज्ज आहेत. येथून दररोज लाखो रुपयांची दारू बाहेर पाठवली जात आहे. त्यांना पोलीस आणि अबकारी विभागाचा आश्रय असल्याने कारवाईसुद्धा थंडावली आहे. काही दिवसांपूर्वी नागभिड (जि. चंद्रपूर) येथे दारू माफियाने पीएसआय छत्रपती चिडे यांची हत्या केली होती. तेव्हापासून पोलिसांनी अवैध दारू तस्कराविरुद्ध कंबर कसली आहे.दारू सप्लायरचा शोधधंतोलीतील प्र्रकरणात धंतोली पोलीस दारूचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. विजेच्या बिलावरून गोदामाचे मालकाची ओळख अमरीश जायस्वाल या नावाने करण्यात आली आहे. पोलीस त्याला शोधत आहे. टिप्परमध्ये ठेवलेली दारू ही या गोदामामधील असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी अबकारी विभागाकडून बॅच नंबरच्या आधारावर दारू पुरवठा करणाऱ्यांची माहिती मागवली आहे. या आधारावर कारवाई केली जाईल.

टॅग्स :liquor banदारूबंदीraidधाड