शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवनवीन शब्दांनी भाषा व साहित्य समृद्ध होते : अरुण गुजराथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 23:05 IST

नवनवीन शब्द प्रत्येक भाषेत नित्य समाविष्ट होत असतात आणि होणेही आवश्यक आहे. कारण या शब्दांनीच भाषा आणि त्या भाषेचे साहित्य समृद्ध होत असते, असे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी केले.

ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे उर्दू साहित्यिकांचा सत्कार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : साहित्यात शब्द हे सर्वात महत्त्वाचे असतात. नवनवीन शब्द प्रत्येक भाषेत नित्य समाविष्ट होत असतात आणि होणेही आवश्यक आहे. कारण या शब्दांनीच भाषा आणि त्या भाषेचे साहित्य समृद्ध होत असते, असे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नागपूरच्यावतीने उर्दू साहित्यिकांच्या सत्कार समारोहात ते बोलत होते.बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे नुकताच आयोजित या सत्कार सोहळ्याच्या वेळी प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष गिरीश गांधी, कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, कराडचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रसिद्ध उर्दू साहित्यिक शरफुद्दीन साहिल प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात नागपूर व कामठीच्या १२ उर्दू साहित्यिकांना उर्दू साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये कवी लोकनाथ यशवंत यांच्यासह डॉ. अजहर हयात, डॉ. नाहीद अफरोज सुरी, अजहर असरार, जियाउल्ला खान लोधी, डॉ. शगुस्था आरीफ, इफ्तरवार नबावर, रियाझ अहमद अमरोधी, डॉ. नसीम अख्तर, डॉ. उबैद खारीन व मोहम्मद इकबाल सिद्दीकी यांचा समावेश आहे.अरुण गुजराथी यांनी हा सत्कार केवळ उर्दू साहित्यिकांचा नसून सर्वच भाषा साहित्यिकांचा गौरव असल्याचे मनोगत मांडले. उर्दू ही १५ भारतीय भाषांमधील सर्वात महत्त्वाची भाषा असल्याचे ते म्हणाले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, उर्दू ही सहज भाषा असून कुणीही नकळत तिच्या प्रेमात पडतो. हा उर्दू साहित्यिकांच्या सृजनशीलतेचा व प्रतिभेचा गौरव असल्याचे ते म्हणाले. डॉ. शरफुद्दीन साहिल यांनी, शायर साहिर लुधियानवी यांचे साहित्य रद्दीच्या दुकानात सापडल्याची खंत व्यक्त करीत साहित्याच्या संवर्धनाचे गरज व्यक्त केली. गिरीश गांधी यांनीही मनोगत मांडले. तसेच सत्कारमूर्ती साहित्यिकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.डॉ. मोहम्मद असदुल्ला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गायक मोहम्मद सलीम शेख यांनी आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर