शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपुरातील कालिदास महोत्सवाच्या जाहिरातीत भाषेचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 10:02 IST

कालिदासाच्या नावाने नागपुरात दरवर्षी भव्य महोत्सव आयोजित करणाऱ्या आयोजन समितीने मात्र महोत्सवाच्या जाहिरातीत भाषेचा पार बट्ट्याबोळ केला आहे.

ठळक मुद्देना धड हिंदी, ना धड मराठी आयोजन समितीचे भाषाअज्ञान चव्हाट्यावरवाचा या भन्नाट चुका शुक्रवार दि. १९ नोव्हेंबर सायंकाळी ५ बजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत एवं सितार जुगलबंदी शास्त्रीय एवं उपशास्त्रीय गायन महेश एलकुंचवार प्रख्यात साहित्यकार

शफी पठाण।आॅनलाईन लोकमतनागपूर : विरहाच्या वेदनेतून मेघदूत रचणारे कालिदास हे प्राचीन भारतातील प्रख्यात संस्कृत कवी होते. केवळ मेघदूतच नव्हे तर आपल्या विलक्षण शब्दसामर्थ्याने त्यांनी रघुवंशम्, कुमारसंभवम्, ऋतुसंहार आदी संस्कृत महाकाव्यांनाही जन्मास घातले. हे लिखाण करताना शुद्ध भाषेवर त्यांचा विशेष भर होता. कारण, पत्नीने लक्षात आणून दिलेल्या भाषाअज्ञानानेच त्यांना लिखाणाची प्रेरणा दिली होती. परंतु याच कालिदासाच्या नावाने नागपुरात दरवर्षी भव्य महोत्सव आयोजित करणाऱ्या आयोजन समितीने मात्र महोत्सवाच्या जाहिरातीत भाषेचा पार बट्ट्याबोळ केला आहे.शुक्रवारी सर्व प्रमुख दैनिकात प्रसिद्ध झालेल्या व सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीतील कार्यक्रम विवरणाच्या रकान्यात प्रमुख शब्द मराठीत अनुवाद करून कंसातील माहिती हिंदीत जशीच्या तशी ठेवण्यात आली आहे. ही जाहिरात बघितली तर लक्षात येते की ही अनवधानाने झालेली चूक अजिबात नाही.ज्यांच्याकडे या जाहिरातीच्या अनुवादाचे काम सोपविण्यात आले त्याला एक तर भाषेचे ज्ञान नाही वा त्याने पाट्या टाकण्याच्या सरकारी प्रवृत्तीतून या घोडचुका केल्या आहेत. बरं...या केवळ व्याकरणाच्या चुका असत्या तर दुर्लक्ष करताही आले असते. परंतु जाहिरातीचा मूळ अनुवादच चुकला आहे. एकाच ओळीतील दिवस व तारीख मराठीत तर वेळ हिंदीत लिहिली आहे. पालकमंत्र्यांचे आडनाव मराठीतही ‘बावनकुले’च आहे. स्थळच्या ठिकाणी ‘स्थल’ कायम ठेवण्यात आले आहे. प्रवेश नि:शुल्क असे जिथे लिहिले आहे त्याच्याच बाजूला मोठ्या अक्षरात ‘प्रवेशिकाची आवश्यकता नाही’असेही लिहिले आहे. कार्यक्रम विवरणाच्या रकान्यात तर आयोजन समितीतील विद्वानांच्या विद्वत्तेचे पार धिंडवडेच निघाले आहेत.

जबाबदारी नेमकी कुणाची?या महोत्सवाचे आयोजन कालिदास समारोह आयोजन समिती, महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळ व नागपूर महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. अशा स्थितीत या घोडचुकांची जबाबदारी नेमकी कुणाची हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्याला कुणाला या जाहिरातीच्या अनुवादाचे काम सोपवले त्याला किमान भाषाज्ञान आहे का हे बघितले गेले की नाही, जर ते बघूनच हे काम सोपवले तर मग इतक्या गंभीर चुका कशा झाल्या की आयोजन समिती अशा कलात्मक कार्यक्रमाकडे केवळ सरकारी सोपस्कार म्हणून पाहते, याचे उत्तर आयोजकांनी महोत्सव संपण्यापूर्वी द्यायला हवे, अशी अपेक्षा नागपूरकर रसिक व्यक्त करीत आहेत. 

टॅग्स :literatureसाहित्य