शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

पावसाळी अधिवेशनात गाजणार भूखंड घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:34 IST

बुधवारपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेराज्य सरकारला घेरण्याचा निर्धार केला आहे. नवी मुंबई येथील सिडको जमिनीच्या व्यवहारावरून कॉंग्रेस व सत्ताधारी यांच्यात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांची सावली या अधिवेशनावर राहणार आहे. या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरविले आहे. सोबतच कर्जमाफी झाल्यानंतर दीड लाखांवरील कर्जाच्या वसुलीसाठी ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांमागे बँकांचा तगादा, पीक विमा, शेतकरी आत्महत्या, कायदा व सुव्यवस्था स्थिती इद्यादी मुद्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे.

ठळक मुद्देसत्ताधारी-विरोधक येणार आमनेसामने शेतकरी प्रश्नांवरून विरोधक करणार ‘हल्लाबोल’ घोटाळे, कायदा-सुव्यवस्थेवर सरकारला घेरणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवारपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेराज्य सरकारला घेरण्याचा निर्धार केला आहे. नवी मुंबई येथील सिडको जमिनीच्या व्यवहारावरून कॉंग्रेस व सत्ताधारी यांच्यात होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांची सावली या अधिवेशनावर राहणार आहे. या मुद्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरविले आहे. सोबतच कर्जमाफी झाल्यानंतर दीड लाखांवरील कर्जाच्या वसुलीसाठी ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांमागे बँकांचा तगादा, पीक विमा, शेतकरी आत्महत्या, कायदा व सुव्यवस्था स्थिती इद्यादी मुद्यांवरून सरकारची कोंडी करण्याचा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे.४ जुलैपासून सुरू होणाºया विधिमंडळ अधिवेशनाची नेमकी रणनीती ठरविण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक मंगळवारी सकाळी नागपुरात होणार आहे. नागपुरात झालेले हिवाळी अधिवेशन कर्जमाफीच्या मुद्यावरूनच गाजले होते. यंदा पावसाळी अधिवेशन विदर्भातच होत असल्यामुळे विरोधकांची भूमिका शेतकरीकेंद्रित राहण्याची शक्यता राहणार असून कर्जमाफीतील गोंधळ, बोंडअळी नुकसानभरपाई, ‘डिजिटल महाराष्ट्र’मधील त्रुटी, मंत्र्यांवर लागलेले घोटाळ्यांचे आरोप, इत्यादी मुद्यांवर विरोधक सरकारला घेरणार आहेत. राज्यातील व विशेषत: उपराजधानीतील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्यावरूनदेखील शासनाला विरोधकांकडून ‘टार्गेट’ करण्यात येईल.दुसरीकडे विरोधकांच्या आक्रमणाला परतावून लावण्यासाठी सत्ताधारीदेखील तयारीत आहेत. मंत्र्यांनी आकडेवारीसह सर्व उत्तरे तयार ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.मंत्री राहणार ‘टार्गेट’विरोधकांकडून मंत्र्यांवरदेखील हल्लाबोल करण्यात येणार आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात आरक्षित जागेवर केलेल्या बंगल्याच्या बांधकामाचा मुद्दा, संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे काम केलेल्या खासगी अंगरक्षकाने घेतलेली हत्येची सुपारी हे मुद्देदेखील विरोधक उचलणार आहेत.विरोधकांची बैठक आजदरम्यान, रविभवन येथे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी दुपारी १२ वाजताच्या सुमारास विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक होणार आहे. विधिमंडळात सरकारची कोंडी करण्याबाबत यावेळी चर्चा होईल.जनतेचे प्रश्न मांडणार, सरकारला सर्वच पातळ्यांवर अपयश आले आहे. जनता हैराण असताना त्याचे मंत्र्यांना काहीही सोयरसूतक नाही. पावसाळी अधिवेशन नागपुरात होत असल्याने विविध समस्यांना वाचा फोडण्याचा आमचा प्रयत्न असेल. नेमक्या कुठल्या मुद्यांना प्राधान्यक्रम द्यायचा हे मंगळवारी होणाºया बैठकीत निश्चित करण्यात येईल.-राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभासरकारला जाब विचारणारराज्य शासनाच्या कारभाराचा फटका जनतेला बसतो आहे. शेतकºयांची कर्जमाफीच्या नावावर थट्टा करण्यात आली. शेतकरी, सामान्य माणूस, नोकरदार, दलित, आदिवासींपैकी कुणालाही हे सरकार आपलेसे वाटत नाही. सर्वसामान्य जनतेच्या मुद्यांवर अधिवेशनात आम्ही शासनाला जाब विचारू.-धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

 

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८nagpurनागपूर