शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

भूधारक शेतकरी होणार भूस्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:08 IST

राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच विदर्भातील लाखो भूधारक शेतकरी आता भूस्वामी होणार आहेत. सोमवारी विधान परिषदेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) आणि महाराष्ट्र जमीन महसूल महसूल विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषत: नागपूर व अमरावती जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

ठळक मुद्देविधान परिषदेत विधेयकाला मंजुरी : नागपूर-अमरावतीसह विदर्भातील चार लाख शेतकऱ्यांना फायदा

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या निर्मितीनंतर प्रथमच विदर्भातील लाखो भूधारक शेतकरी आता भूस्वामी होणार आहेत. सोमवारी विधान परिषदेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) आणि महाराष्ट्र जमीन महसूल महसूल विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषत: नागपूर व अमरावती जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.सभागृह नेते व महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी परिषदेत विवक्षित भूमिधारींचा भोगवटादार वर्ग १ मध्ये अंतर्भाव करण्यासाठी परवानगी देण्याबाबत विधेयक सादर केले. महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळी मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावरील भूभाग महाराष्ट्रात शामील झाला. तेव्हापासून विदर्भातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासकीय दस्तावेजांमध्ये वर्ग २ मध्येच दाखविण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन असूनही वर्ग २ मुळे शेतकरी सरकारच्या परवानगीशिवाय त्याची खरेदी विक्री करू शकत नव्हते. आता सरकारने त्या वर्ग १ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.सरकारतर्फे सरसकट याची अंमलबजावणी केली जाईल. विदर्भातील सर्व गावांचा यात समावेश केला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी या विधेयकाचे समर्थन केले. मात्र याचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत जावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. रामहरी रुपनवर, अनिल सोले, शरद रणपिसे, जोगेंद्र कवाडे, सुरेश धस यांनीदेखील या विधेयकासंदर्भातील चर्चेत भाग घेतला.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Farmerशेतकरी