शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

चंद्रभागातिरी विठ्ठलाचा गजर; लाखो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:35 AM

विदर्भाचे पंढरपूर असलेल्या धापेवाडा येथे बुधवारी आषाढी पौर्णिमेच्या द्वितीयेला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर उसळला.

ठळक मुद्देकांचन गडकरी यांच्या हस्ते महापूजापावसासाठी शेतकऱ्यांचे साकडेशेकडो पालख्या दिंड्या दाखल

सुनील वेळेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: विदर्भाचे पंढरपूर असलेल्या धापेवाडा येथे बुधवारी आषाढी पौर्णिमेच्या द्वितीयेला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर उसळला. ‘विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल’च्या जयघोषाने संपूर्ण धापेवाडा नगरी दुमदुमून गेली. बुधवारी पहाटे ५.३० वाजता संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचनताई नितीन गडकरी यांच्या हस्ते विठूरायाची महापूजा व अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मानकर, अरुणा मानकर, श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रुद्रप्रतापसिंह पवार, सचिव आदित्यप्रतापसिंह पवार, भानुप्रतापसिंह पवार, कोलबास्वामी मठाचे मठाधिपती श्रीहरी महाराज वेळेकर, बाबा कोढे, दिलीप धोटे, माजी सरपंच मनोहर काळे, राजेश शेटे, गोविंदा शेटे, शेखर ठाकरे व गावकरी उपस्थित होते. दरम्यान दुपारी राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धापेवाडा येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले.आषाढी पौर्णिमेला पंढरपूरचा पांडुरंग धापेवाड्यात अवतरतो अशी आख्यायिका आहे. त्याप्रमाणे शुक्रवारी रात्री १२ वाजता धापेवाड्यात पांडुरंगाचे आगमन झाले. सुमारे २७५ वर्षांपासूनचा इतिहास असलेल्या या यात्रेत दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांनी लाखोच्या संख्येत हजेरी लावली. पांढरे धोतर-बंगाली परिधान करून, डोक्यावर भगवी टोपी घालून, हातात टाळ-मृदंग घेऊन पालख्यांसोबत जय हरी विठ्ठलच्या गजरात वारकरी पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन नाचत होते. विविध वेशभूषा करून आलेली भजन मंडळी यात्रेकरूंना आकर्षित करीत होते. लहान-मोठ्यापासून सर्व विठूरायाच्या भक्तीत दंग झाले होते. यात्रेत मध्यप्रदेश, विदर्भ व सुरत येथून भाविक दर्शनाला आले होते. सोमवारी सायंकाळपर्यंत येथे शेकडो पालख्या, दिंड्या दाखल झाल्या. चंद्रभागेच्या पात्रातून मार्गक्रमण करत असताना नदीच्या पात्रातही वारकऱ्यांचा मेळा जमला होता. सकाळपासून सायंकाळपर्यंत दोन लाखापेक्षा जास्त भाविकांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले. यात्रेच्या यशस्वीतेसाठी स्वयंभु श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे सचिव आदित्यप्रतापसिंह पवार, भानुप्रतापसिंह पवार, कृष्णप्रतापसिंह पवार, शंकर ठाकरे, विनोद मेश्राम, शीतल सवाईतुल, मारोती धोटे, अनिल डोईफोडे, दीपक पराते, मंगेश धोटे, प्रवीण मेश्राम, अनिकेत वाघ यांनी परिश्रम घेतले.

रात्रभर जागरणविठ्ठल भक्तांमध्ये संत रघुसंत महाराज, संत मकरंदपुरी महाराज, संत वारामाय व आखुंजी बाबा यांचे देवस्थान येथे आहेत. या सर्व देवस्थानातील दिंड्या तसेच विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या दिंड्या रात्री बाजार चैकात एकत्र येतात. रात्रभर ढोलकी व झांजेच्या आवाजाने संपूर्ण गाव दुमदुमून निघते. दिंड्यांवर गावकरी लाह्यांचा वर्षाव करतात. सारे गाव या दिवशी रात्रभर जागरण करते. रात्री ७ ते पहाटे ५ पर्यंत या दिंड्या गावभ्रमण करत पुन्हा विठ्ठलाच्या मंदिरात पोहोचतात. या दिंड्यांसाठी दूरवरून भाविक येतात.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी