शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विद्यार्थिनीला भररस्त्यावर मारहाण : सडकछाप मजूनंचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 19:43 IST

सडकछाप मजनूंनी शाळेच्या गेटजवळ उभी असलेल्या एका विद्यार्थिनीला भररस्त्यावर अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार वडिलांना सांगते, असे म्हणताच पीडित विद्यार्थिनीला आरोपींनी तुझ्या वडिलांनाही जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी तिघांवर गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देवडिलांनाही जीवे मारण्याची धमकी : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सडकछाप मजनूंनी शाळेच्या गेटजवळ उभी असलेल्या एका विद्यार्थिनीला भररस्त्यावर अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. हा प्रकार वडिलांना सांगते, असे म्हणताच पीडित विद्यार्थिनीला आरोपींनी तुझ्या वडिलांनाही जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी तिघांवर गुन्हा दाखल केला.अली मनिहार (वय २५), शहजाद खान (वय २३) आणि वीरू मुजावर (वय २४), अशी आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी मनिहार हा ८ आॅक्टोबरपासून पीडित मुलीचा पाठलाग करतो. ती शिकवणी वर्गाला जात असताना तिच्याशी सलगी साधण्याचा प्रयत्न करतो. गुरुवारी दुपारी १२.३० च्या सुमारास असेच झाले. ती शिकवणी वर्गाला जात असताना मनिहार, शहजाद आणि वीरू हे तिघे तिचा पाठलाग करू लागले. त्यांच्या भीतीमुळे ती शाळेच्या गेटजवळ उभी झाली. आरोपी तेथे येऊन तिच्याशी लज्जास्पद वर्तन करू लागले. पीडित मुलीने त्यांना विरोध करून हा प्रकार वडिलांना सांगेन, असे म्हटले. त्यामुळे आरोपी मनिहारने तिला मारहाण करून तुझे वडील माझे काय बिघडवतील, असे म्हणत त्यांना जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. यामुळे प्रचंड दहशतीत आलेल्या मुलीने आपल्या पालकांना हा गैरप्रकार सांगितला. त्यांनी धीर देऊन तिला एमआयडीसी ठाण्यात नेले. तेथे तिची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी विनयभंग करणे, मारहाण करणे आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली आरोपी मनिहार, शहजाद आणि वीरू या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग