शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनो, गुणांचा गुणाकार व दुर्गुणांचा भागाकार करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:30 IST

महिलांनो, स्वत:मधील गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांचा भागाकार करा, असे आवाहन आम्ही उद्योगिनी संस्थेच्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी केले.

ठळक मुद्देमीनल मोहाडीकर यांचे आवाहन : महिला दिनानिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महिलांमध्ये जन्मजातच उद्योजकतेचे गुण असतात. एखाद्या संकटाच्या वेळी आकस्मिक परिस्थितीत घर आणि कुटुंबाचा व्यवसाय सांभाळण्याची क्षमताही त्यांच्यात असते व असंख्य महिलांनी ती क्षमता सिद्धही केली आहे. रोजच्या खाद्यपदार्थांपासून अनेक व्यवसाय त्या यशस्वीपणे करू शकतात. प्रत्येक महिलेमध्ये ही क्षमता आहे आणि प्रत्येकीच्या जीवनात अशी संधी येते. गरज आहे ती केवळ स्वत:मधील गुण आणि कौशल्य ओळखण्याची. त्यामुळे महिलांनो, स्वत:मधील गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांचा भागाकार करा, असे आवाहन आम्ही उद्योगिनी संस्थेच्या अध्यक्षा मीनल मोहाडीकर यांनी केले.गायत्री महिला औद्योगिक सहकारी संस्था व कल्पतरू महिला औद्योगिक सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘उद्यमशील लक्ष्मीची पावले’ या कार्यक्रमात मीनल मोहाडीकर यांच्या मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक रमेश मंत्री, गायत्री संस्थेच्या कांचन गडकरी, कल्पतरू संस्थेच्या नीलिमा बावने, सहकार भारतीच्या विजया भुसारी प्रामुख्याने उपस्थित होत्या. मोहाडीकर यांनी त्यांच्या संस्थेच्या आंतरराष्टÑीय स्तरावर सुरू असलेल्या कार्याबाबत माहिती दिली. उद्योगाच्या क्षेत्रात शून्यातून यश प्राप्त केलेल्यांची अनेक उदाहरणे देत यशाचा मार्ग सांगितला. यशस्वी उद्योजक होण्यासाठी पायाला चाके म्हणजे मार्केटिंगचे कौशल्य, तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असण्यासोबत वेळ व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सर्वांना एकत्रित घेऊन काम करावे लागते. आपल्या क्षमता ओळखून, कौटुंबिक जबाबदाºया न टाळता अडथळे पार करीत आलेल्या संधीचे सोने करता आले पाहिजे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ‘मी हे करू शकते’ हा सकारात्मक भाव जोपासला पाहिजे. आपली आवड ओळखून निवड केल्यास ते करण्याची सवड आपोआपच मिळेल, असा मंत्र त्यांनी दिला.योगा ट्रेनिंग हा व्यवसाय म्हणून पुढे येत आहे. शहरातील एकटे राहणाºया वृद्ध दाम्पत्यांचे संगोपन हाही व्यवसाय ठरू शकत असल्याचे सांगत पापड, लोणच्यापासून अनेक व्यवसायांची माहिती त्यांनी यावेळी दिली. उद्योग स्थापन केल्यानंतर उद्योग आधार कार्ड, एमएसएमई नोंदणी यासारखे सर्व पेपर वर्क योग्यपणे केले तर शासकीय आणि बँकांच्या विविध योजनांचा लाभ मिळेल, असा सल्लाही त्यांनी दिला. आपल्या वस्तूंची गुणवत्ता, पॅकेजिंग व मार्केटिंग या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष द्या. आपल्या मुलांना उद्योगापासून परावृत्त करणे, हा दुर्गुण मराठी माणसांमध्ये असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८nagpurनागपूर