शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आॅईल विक्रीच्या नावावर लाखोंचा चूना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:50 IST

कुकिंग आॅईल विकण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी हुडकेश्वरमधील एका व्यावसायिकाला ७ लाख, ७० हजारांचा गंडा घातला. निशांत पांडुरंग जांगरे (वय ३२, रा. अध्यापकनगर, मानेवाडा) असे फसगत झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गब्बार जबोर नामक हंगेरीतील आरोपीवर गुन्हा नोंदविला आहे.

ठळक मुद्देहंगेरीतील आरोपी : हुडकेश्वरमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुकिंग आॅईल विकण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी हुडकेश्वरमधील एका व्यावसायिकाला ७ लाख, ७० हजारांचा गंडा घातला. निशांत पांडुरंग जांगरे (वय ३२, रा. अध्यापकनगर, मानेवाडा) असे फसगत झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गब्बार जबोर नामक हंगेरीतील आरोपीवर गुन्हा नोंदविला आहे.२९ जून २०१६ ला फिर्यादी जांगरे गुगलवर प्रोडक्ट सर्च करीत होते. दरम्यान त्यांना एफ.ई. एम. एन.वाय. ई. आर. एस. ए. एन. एम. ए. जी. कं.एच.डी नावाच्या हंगेरी येथील कंपनीबाबत माहिती मिळाली. कंपनीचा यूज्ड कुकिंग आॅईलचा व्यवसाय असल्याची त्यावर माहिती होती. त्यांनी वेबसाईटवर दिलेल्या फोन क्रमांक ३२४६५७७७९७४ वर कंपनीचा एजंट (आरोपी) गब्बार जबोर याच्याशी संपर्क साधून आपल्याला कुकिंग आॅईल खरेदी करायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आरोपी जबोर याने पाठवलेल्या नमुन्यावर सह्या करून कंपनीशी करार केला. करारानंतर आरोपीने त्यांना हंगेरी येथील कंपनीच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तांत्रिक कारणांमुळे पैसे जमा होऊ शकले नाही. त्यामुळे आरोपीने त्यांना दिल्लीतील लाल थागून नावाच्या इसमाच्या स्टेट बँक आॅफ मैसूर या बँकेच्या खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यानुसार जांगरे यांनी लाल थागूनच्या ७ लाख, ७० हजार रुपये जमा केले. पैसे जमा झाल्यावर आरोपी जबोरने त्यांना व्यवहारासंबंधीची कागदपत्र पाठविले. कागदपत्र तपासल्यानंतर ती बनावट असल्याचे जांगरे यांच्या लक्षात आले. त्यांनी आरोपीशी संपर्क साधून रक्कम परत मागितली असता त्याने नकार दिला. आरोपीने फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने जांगरे यांनी थेट डायरेक्टर जनरल आॅफ फॉरेन ट्रेड यांच्याकडे तक्रार दाखल केली. मात्र तेथून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी त्यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर