शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

नागपूर शहरातील तलावात आॅक्सिजनची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 22:02 IST

शहरातील तलावात आॅक्सिजनची मात्रा कमी होत आहे. प्रदूषणामुळे तलावातील जलचर आॅक्सिजनसाठी तडफत आहे. यात सर्वाधिक गंभीर स्थिती फुटाळा तलावाची आहे. गांधीसागर तलावाची अवस्थासुद्धा काहीशी अशीच आहे, असा खुलासा ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनद्वारे करण्यात आला आहे.

ठळक मुद्देफुटाळा तलावाची अवस्था गंभीर : विसर्जनानंतर तलावाची दुरवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तलावात आॅक्सिजनची मात्रा कमी होत आहे. प्रदूषणामुळे तलावातील जलचर आॅक्सिजनसाठी तडफत आहे. यात सर्वाधिक गंभीर स्थिती फुटाळा तलावाची आहे. गांधीसागर तलावाची अवस्थासुद्धा काहीशी अशीच आहे, असा खुलासा ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनद्वारे करण्यात आला आहे.अमेरिकेची प्रसिद्ध पर्यावरण संस्था ‘अर्थ इको इंटरनॅशनल’ सोबत मिळून फाऊंडेशनने शहरातील तीन मुख्य तलावांवर निरीक्षण केले. अर्थ इको इंटरनॅशनल दरवर्षी जगभरातील नदी, तलावाचे पाणी गुणवत्ता व प्रदूषणावर पुस्तक प्रकाशित करते. यात १४६ देशांचा समावेश आहे. दरवर्षी ग्रीन व्हिजिल गणपती विसर्जनापूर्वी व विसर्जनानंतर शहरातील तलावाच्या पाण्याचे नमुने घेऊन त्याचे निरीक्षण करते. त्यांनी केलेल्या निरीक्षणात फुटाळा तलावात आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. सोनेगावची स्थिती चांगलीफाऊंडेशनतर्फे करण्यात आलेल्या निरीक्षणात सोनेगावची स्थिती चांगली आढळली आहे. कारण सोनेगाव तलावात यावर्षी विसर्जनास बंदी होती. त्यामुळे तलावातील पाण्यात डिजॉल्ड आॅक्सिजन, टर्बिडीटी आणि पीएचच्या पातळीत फार फरक आढळून आला नाही. गांधीसागरवर परिणाममनपाने विसर्जनासाठी बंदी घातल्यानंतरही गांधीसागर तलावात विसर्जन झाले आहे. त्याचा परिणाम तलावातील डिजॉल्ड आॅक्सिजन मात्रेवर पडला आहे. गणपती विसर्जनापूर्वी तलावातील डिजॉल्ड आॅक्सिजन ४.५ ते ५ मिलिग्राम होते. विसर्जनानंतर ते ४ ते ४.५ मिलिग्रामवर आले आहे. टर्बिडीटीचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. फक्त पाण्याचा पीएच कायम आढळला आहे. फुटाळ्याला बसला फटकाविसर्जनाचा सर्वाधिक भार फुटाळा तलावावर असल्याने फुटाळ्याची प्रदूषणाची पातळी चांगलीच फुगली आहे. फुटाळा तलावात आॅक्सिजनच्या मात्रेत एक मिलिग्रामची घट दिसून आली आहे. टर्बिडीटीची मात्रासुद्धा १० जेटीयुने वाढली आहे. पाण्याचा पीएच ८ ते ८.५ दरम्यान आहे. तलावाच्या इको सिस्टमवर होतोय परिणामतलावातील पाण्यात आॅक्सिजनची मात्रा कमी झाल्याने त्याचा परिणाम जलचरावर होतो. फुटाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेले विसर्जन लक्षात घेता, त्याची सफाई लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. फुटाळ्यातील बंद पडलेले कारंजे तत्काळ सुरू करणे आवश्यक आहे. डिजॉल्ड आॅक्सिजनची मात्रा दोन मिलिग्रामपर्यंत गेल्यास तलावाची इको सिस्टम बिघडू शकते.कौस्तुभ चटर्जी, संस्थापक, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशन

टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलावnagpurनागपूर