शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विभागाच्या दिरंगाईचा मुलांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:29 IST

आदिवासी विकास विभागाद्वारे आदिवासी मुलांना नामांकित शाळेत प्रवेशासाठी विशेष योजना राबविली जाते. मात्र ही योजना सध्या आदिवासी पालकांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. विभागाद्वारे योजनेची प्रक्रिया राबविण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे मुलांच्या शाळा प्रवेशाचा खोळंबा निर्माण झाला आहे. यामुळे विभागाच्या योजनेतून नामांकित शाळेत प्रवेशाची वाट पाहत असणाऱ्या पालकांना मुलांचे वर्ष वाया जाईल की काय, ही भीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपहिल्या वर्गाच्या प्रवेशाचा खोळंबा : पालकांची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आदिवासी विकास विभागाद्वारे आदिवासी मुलांना नामांकित शाळेत प्रवेशासाठी विशेष योजना राबविली जाते. मात्र ही योजना सध्या आदिवासी पालकांसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. विभागाद्वारे योजनेची प्रक्रिया राबविण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे मुलांच्या शाळा प्रवेशाचा खोळंबा निर्माण झाला आहे. यामुळे विभागाच्या योजनेतून नामांकित शाळेत प्रवेशाची वाट पाहत असणाऱ्या पालकांना मुलांचे वर्ष वाया जाईल की काय, ही भीती निर्माण झाली आहे.झिंगाबाई टाकळी, बोखारा येथे राहणाºया जय गेडाम यांच्यासह इतर अनेक पालकांनी याबाबत व्यथा मांडली आहे. आदिवासी विभागाद्वारे गरीब मुलांना पहिल्या वर्गात प्रवेशासाठी नामांकित शाळा प्रवेश योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत यावर्षी ६५० च्यावर पालकांनी अर्ज केला होता. विभागाने अर्जातील त्रुटींमुळे काही अर्ज रद्द करून प्रवेशासाठी ५२२ मुलांचे अर्ज पात्र ठरले असून, ही यादी आदिवासी भवनात लावण्यात आली आहे. योजनेच्या निर्धारित संख्येनुसार विभागाद्वारे लकी ड्रॉ काढून ५२२ पैकी केवळ १०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यातच खरा घोळ निर्माण झाला असून यामुळे पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. खासगी वाहनचालक असलेल्या जय गेडाम यांचा व त्यांच्या भावाच्या मुलांसाठी अर्ज केला होता व त्यांची नावेही निवड यादीत आहेत. मात्र एकीकडे बहुतेक शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुदत संपत आहे तर दुसरीकडे विभागाची प्रक्रिया खोळंबली आहे. अशापरिस्थितीत विभागाच्या लकी ड्रॉमध्ये त्यांची मुले अपात्र ठरली तर मुलांचा प्रवेश कुठे घ्यायचा, हा प्रश्न त्यांच्या व इतर पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. शाळांमध्ये प्रवेशच मिळाला नाही तर त्यांच्या मुलांचे वर्ष वाया जाणार की काय, अशी भीती त्यांच्यात निर्माण झाली आहे. विभागाचे अधिकारी याबाबत समाधानकारक उत्तर देत नसल्याचे गेडाम यांनी सांगितले. ही प्रक्रिया पुणे व नाशिकमधून होत असल्याने आमच्या हाती काही नाही, असे उत्तर मिळत असल्याचे गेडाम म्हणाले. ५२२ पैकी कोणत्याही १०० मुलांची निवड तर होईल. मात्र विभागाच्या या दप्तरदिरंगाईमुळे निवड न झालेल्या ४२२ मुलांच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी