शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

क्या बात... फर्स्ट क्लास अन् डिस्टिंक्शनचा टक्का वाढला, नागपूर विभागातून ७ टक्के विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण

By योगेश पांडे | Updated: May 21, 2024 23:59 IST

Nagpur HSC Result; बारावीच्या निकालात दरवर्षी प्रावीण्य श्रेणीत किती विद्यार्थी उत्तीर्ण होतात याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले असते. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत प्रावीण्य श्रेणी व प्रथम श्रेणीचा नागपूर विभागाचा टक्का वाढला आहे.

- योगेश पांडेनागपूर - बारावीच्या निकालात दरवर्षी प्रावीण्य श्रेणीत किती विद्यार्थी उत्तीर्ण होतात याकडे शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले असते. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत प्रावीण्य श्रेणी व प्रथम श्रेणीचा नागपूर विभागाचा टक्का वाढला आहे. ३७ टक्के विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत, तर ७ टक्के विद्यार्थी ७५ टक्क्यांहून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाले आहेत. प्रत्येक तीन विद्यार्थ्यांमागे एकाला तरी फर्स्ट क्लासचे गुण मिळाले आहेत.

यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर विभागातील विद्यार्थ्यांमध्ये थोडीथोडकी २.१९ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०२१ ते २०२३ या कालावधीत प्रावीण्य श्रेणीच्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने घट झाली होती. मात्र, यावर्षी त्याला ब्रेक लागला आहे. यंदा ११ हजार २४ विद्यार्थ्यांना डिस्टिंक्शन मिळाले आहे.

शिवाय विभागात ‘फर्स्ट क्लास’ उत्तीर्ण झालेल्यांची संख्यादेखील ३.४ टक्क्यांनी वाढली आहे. २७.०१ टक्के विद्यार्थी या श्रेणीत आहेत. मागील वर्षी अर्ध्याहून अधिक विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. यंदा यात घट झाली असून ४४.८७ टक्के द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

नागपूर विभागात एकूण १ लाख ५५ हजार ३७४ पैकी १ लाख ४३ हजार १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण परीक्षार्थ्यांपैकी ४१ हजार ९६७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत. द्वितीय श्रेणीत ६९ हजार ७११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी ७१ हजार ३५९ म्हणजेच ५१.९१ टक्के विद्यार्थी या श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सर्वांत जास्त विद्यार्थी याच श्रेणीत आहेत.

श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थीश्रेणी – टक्केवारी (२०२४) - टक्केवारी (२०२३) - टक्केवारी (२०२२) - टक्केवारी (२०२१) - टक्केवारी (२०२०)प्रावीण्य – ७.०९ - ४.९० - १३.९० - ४६.६९ - ७.२३

प्रथम – २७.०१ - २३.६१ - ३९.२० - ४५.३६ - २९.८५द्वितीय – ४४.८७ - ५१.९१ - ३८.३९ - ७.४९ - ५०.१९

उत्तीर्ण – १३.१५ - १९.४७ - ५.०६ - ०.०८ - ४.३७अनुत्तीर्ण – ७.८८ - ९.६५ - ३.४६ - ०.३८ - ८.३५

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालnagpurनागपूर