शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

कुणब्यांनी मुठ बांधली, आज ‘एल्गार’ बैठक; संघर्ष समिती स्थापन करणार

By कमलेश वानखेडे | Updated: September 7, 2023 17:12 IST

कुणबी समाजाच्या हक्कांवर कुणी गदा आणत असेल तर ते रोखण्यासाठी आंदोलन पुकारून प्रसंगी आमरण करण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.

नागपूर : मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेला विदर्भातील कुणबी समाज संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. गुरुवारी कुणबी समाजातील विविध शाखांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यानंतर समाज प्रतिनिधींची बैठक झाली. तीत या मुद्यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी ‘एल्गार’ बैठक बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला. कुणबी समाजाच्या हक्कांवर कुणी गदा आणत असेल तर ते रोखण्यासाठी आंदोलन पुकारून प्रसंगी आमरण करण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.

अखिल कुणबी समाज नागपूर, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बहुउद्देशीय तिरळे कुणबी समाज, बावणे कुणबी समाज, खैरे कुणबी समाज, संत तुकाराम महाराज जयंती सेवा समिती, कुणबी सेना, खेडुला कुणबी समाज, खैरे कुणबी समाज सुधारक संस्था, लोणारे कुणबी समाज बहुउद्देशीय समाज मंडळ, संत तुकाराम महाराज कार्य समिती, बहुउद्देशीय खैरे कुणबी विचार मंच, कुणबी समाज संघटना या सर्व समाज संघटनांचे प्रतिनिधी गुरुवारी एकत्र आले व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

यानंतर सर्व प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीला माजी मंत्री सुनील केदार, माजी आमदार अशोक धवड, जानराव पाटील केदार, पुरुषोत्तम शहाणे, नरेश बरडे, अनंत बारसाकडे, दुनेश्वर आरीकर, सुषमा भड, अवंतिका लेकुरवाळे, अरुण वऱ्हाडे, वामनराव येवले, परमेश्वर राऊत, राजू मोहोड, प्रकाश काळबांडे, मनोहर आवारी, गणेश नाखले, दादाराव डोंगरे, शरद वानखेडे, हरीश्चंंद्र बोंडे, बाबा ढोबळे, बाबा तुमसरे, सुरेश कोंगे, शरद वानखेडे, रमेश राऊत, श्रीधर नहाते, बाळा शिंगणे, रविंद्र देशमुख, सुरेश वर्षे, मनोहर फुके आदी उपस्थित होते.

तर महाराष्ट्र बंद करून दाखवू- मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यास विरोध नाही. पण त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये व ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये. राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतला तर कुणबी समाज ओबीसी बांधवांसह रस्त्यावर उतरेल व महाराष्ट्र बंदची हाक दिली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

येथे होईल बैठक- अखिल कुणबी समाज, विठ्ठल रुखमाई मंदिर, नवाबपुरा, जुनी शुक्रवारी रोड येथे दुपारी ३ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व शाखीय संघर्ष समिती स्थापन करून लगेच आंदोलन पुकारले जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर