शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर कुलींची रेल्वे प्रशासनाविरुद्ध नारेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:08 IST

आपल्या मागण्यांसाठी नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींनी सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाच्या बॅनरखाली कामबंद आंदोलन केले. कुलींनी मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या प्रशासनाविरुद्ध जोरदार नारेबाजी करून प्लॅटफार्म क्रमांक १ वरून मोर्चा काढला. हा मोर्चा सर्व प्लॅटफॉर्मवर फिरून आल्यानंतर स्टेशन मॅनेजर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देप्लॅटफॉर्मवर काढला मोर्चा : स्टेशन व्यवस्थापक कार्यालयासमोर धरणे

आॅनलाईन लोकमतनागपूर : आपल्या मागण्यांसाठी नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींनी सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाच्या बॅनरखाली कामबंद आंदोलन केले. कुलींनी मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या प्रशासनाविरुद्ध जोरदार नारेबाजी करून प्लॅटफार्म क्रमांक १ वरून मोर्चा काढला. हा मोर्चा सर्व प्लॅटफॉर्मवर फिरून आल्यानंतर स्टेशन मॅनेजर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.कुलींच्या आंदोलनाचे नेतृत्व सेंट्रल रेल्वे भारवाहक संघाचे पदाधिकारी अब्दुल माजिद, अजय पाल, प्रवीण नखाले, ज्ञानेश्वर पाटील, मनोज वासनिक यांनी केले. आंदोलनात बॅटरी कारवर लगेजला परवानगी देऊ नये, बिल्ला हस्तांतरणातील अडचणी दूर कराव्या, आरएमएस इमारतीतील कुली रेस्ट हाऊस सुरू करून त्यात सुविधा पुरवाव्या, चंद्रपूर आणि बल्लारशाच्या कुलींना गणवेश आणि बिल्ले द्यावे, कुलींना रेल्वेत नोकरी द्यावी आदी मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. कुलींनी दुपारी ३ पासून सायंकाळी ६ पर्यंत धरणे आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेऊन विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय डॅनियल यांनी कुलींशी चर्चा केली. बॅटरी कारमध्ये लगेज नेण्याच्या निर्णयासाठी पाच दिवस लागणार असल्याचे सांगितले. याशिवाय बिल्ला हस्तांतरणातील अडचणी त्वरित दूर करण्याचे आणि कुली रेस्ट हाऊसमध्ये सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. चंद्रपूर-बल्लारशा येथील कुलींना त्वरित बिल्ले, गणवेश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुलींना नोकरी देण्याची बाब रेल्वे मंत्रालयांतर्गत येत असल्यामुळे प्रशासन याबाबत रेल्वे बोर्डाकडे शिफारस करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय डॅनियल यांनी दिलेल्या आश्वासनामुळे कुलींनी आपले आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर