शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, कृष्णा खोपडे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 13:59 IST

थोडी नैतिकता शिल्लक राहिली असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, असेदेखील खोपडे म्हणाले.

नागपूर : सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाजप नेत्यांना मौन बाळगण्याचे निर्देश असताना पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना नेते खा. संजय राऊत उलटसुलट वक्तव्य देऊन राज्यातील शांतता भंग करण्याचे व राज्यात दंगली भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून तत्काळ त्यांना अटक करावी, अशी मागणी खोपडे यांनी केली.

राणा दाम्पत्याने मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केली, तर त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालविण्यात आला. आता उघडपणे धमक्या दिल्या जात असताना राऊतांवर देखील अशीच कारवाई करायला हवी. शिवसेनेचे कार्यकर्ते ज्या प्रमाणे रस्त्यावर येऊन गुंडागर्दी करीत आहेत, त्यावरून उद्धव ठाकरे यांचे सरकार कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यातील नागरिकांच्या हितापेक्षा उद्धव ठाकरे यांना स्वत:ची खुर्ची वाचविण्यात जास्त रस आहे, असा आरोप खोपडे यांनी लावला. जर थोडी नैतिकता शिल्लक राहिली असेल तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, असेदेखील खोपडे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतKrushna Khopdeकृष्णा खोपडेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ