शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले निधी कंपनीची याचिका मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:39 IST

Nagpur : एनडीएच-४ फॉर्म नामंजुरीचा आदेश रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एनडीएच-४ फॉर्म फेटाळण्याच्या आदेशाविरुद्ध बुलढाणा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले निधी कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका मंजूर करण्यात आली. न्यायमूर्तीद्वय मुकुलिका जवळकर व महेंद्र चांदवाणी यांनी हा निर्णय दिला.

कॉर्पोरेट अफेयर विभागाच्या सहायक संचालकांनी विविध तांत्रिक त्रुटींच्या आधारावर २३ ऑक्टोबर २०२३ रोजी वादग्रस्त आदेश जारी केला होता. परंतु, हा आदेश जारी करण्यापूर्वी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागण्यात आले नाही. परिणामी, कंपनीला सुनावणीची संधी मिळाली नाही. त्यामुळे नैसर्गिक न्यायतत्वाची पायमल्ली झाली. उच्च न्यायालयाने ही बाब लक्षात घेत वादग्रस्त आदेश अवैध ठरवून रद्द केला. या आदेशाविरुद्ध कंपनीचे संचालक योगेश गवळी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

कंपनी कायद्यातील कलम ४०६ अंतर्गत १५ जुलै २०१९ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले निधी कंपनीची स्थापना झाली आहे. त्यानंतर कंपनीने निधी कंपनी म्हणून कार्य करायला सुरुवात केली. दरम्यान, २०१९ मध्येच सुधारित निधी नियम लागू करण्यात आले. त्यानुसार, निधी कंपनी म्हणून काम करण्यासाठी एनडीएच-४ फॉर्म सादर करणे अनिवार्य झाले. त्याकरिता, या कंपनीने एनडीएच-४ फॉर्म सादर केला होता. 

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय