शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

मेडिसीन, बधिरीकरण डॉक्टरांवरच कोविडचा ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 01:19 IST

‘कोविड-१९’ रुग्णांवर उपचार करणे, त्यांची नोंद ठेवणे, ऑनलाईन माहिती भरणे, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे आदी कामांचा ताण औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) व बधिरीकरणशास्त्र विभागाच्या डॉक्टरांवर पडला आहे. यात इतर विभागातील डॉक्टर मदत करीत नसल्याची बाब समोर आली आहे. अशा डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची रुग्णसेवेत हजेरी लावण्याची व जे हजर राहणार नाहीत किंवा कामचुकारपणा करतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश शासनाने सर्व अधिष्ठात्यांना दिले आहेत.

ठळक मुद्देइतरही डॉक्टरांना सहभागी करून घेण्याचे निर्देश : कामचुकारपणा करणाऱ्या डॉक्टरांवर शिस्तभंगाची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोविड-१९’ रुग्णांवर उपचार करणे, त्यांची नोंद ठेवणे, ऑनलाईन माहिती भरणे, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधणे आदी कामांचा ताण औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) व बधिरीकरणशास्त्र विभागाच्या डॉक्टरांवर पडला आहे. यात इतर विभागातील डॉक्टर मदत करीत नसल्याची बाब समोर आली आहे. अशा डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची रुग्णसेवेत हजेरी लावण्याची व जे हजर राहणार नाहीत किंवा कामचुकारपणा करतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश शासनाने सर्व अधिष्ठात्यांना दिले आहेत.राज्यात वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. परंतु या रुग्णांवर औषधोपचार करण्याची जबाबदारी केवळ मुख्यत्वे मेडिसीन व बधिरीकरण विभागाच्या डॉक्टरांवरच आहे. यामुळे यांच्यावर कामाचा मोठा ताण पडला आहे. या कार्यात इतर विभागासोबतच अचिकित्सालयीन विभागातील डॉक्टर मदत करीत नसल्याचे व जबाबदारी देऊनही हात वर करीत असल्याचा प्रकार सामोर आला आहे. विशेष म्हणजे, कोविडच्या पार्श्वभूमीवर विशेषत: अचिकित्सालयीन विभागातील डॉक्टरांना कामच नाही. सकाळी ११ वाजता येऊन दुपारी २ वाजता घरी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याच्या तक्रारी झाल्याने शासनाने याची स्वत: दखल घेतली. १९ मे रोजी परिपत्रक काढले. यात मेडिसीन व बधिरीकरणशास्त्र विभागातील डॉक्टर वगळता सर्व विभागातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी दररोज कर्तव्यावर हजर राहण्याचे व अधिष्ठात्यांनी नेमून दिलेली कामे करण्याचे निर्देशा दिले. जे डॉक्टर व कर्मचारी कर्तव्यावर हजर राहणार नाहीत किंवा कामचुकारपणा करतील त्यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात कसूर केल्यामुळे शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल. तसेच अनुपस्थित राहणारे डॉक्टर व कर्मचारी हे साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायदानुसार दंडनीय कारवाईस पात्र राहतील, असेही शासन परिपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर