शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
3
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
4
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
5
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
6
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
7
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
8
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
9
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
10
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
11
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
12
अमेरिकन गरुड, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती!
13
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
14
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...
15
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
16
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
17
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
20
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव

कोविड सेंटरमधून पळाला, सकाळी मृतदेहच मिळाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST

उमरेड : कोविड सेंटरमध्ये नजरेसमोरच दोन जणांचा जीव गेला. या धक्क्यातून तो स्वत:ला सावरू शकला नाही. रात्री उशिरा ऑक्सिजन ...

उमरेड : कोविड सेंटरमध्ये नजरेसमोरच दोन जणांचा जीव गेला. या धक्क्यातून तो स्वत:ला सावरू शकला नाही. रात्री उशिरा ऑक्सिजन काढल्यानंतर आरोग्य यंत्रणेला हुलकावणी देत त्याने पळ काढला. सर्वत्र खळबळ उडाली. शोधकार्यासाठी धावपळ सुरू झाली. पोलीस ठाण्यात याबाबत सूचना देण्यात आली. अखेरीस सकाळीच ‘त्या’ रुग्णाचे प्रेतच रस्त्यावर आढळून आले. उमरेड येथील या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. राजेश बाबुराव नान्हे (३५, रेवतकर ले-आऊट, उमरेड) असे मृताचे नाव आहे.

राजेश नान्हे खासगी चारचाकी वाहने किरायाने देण्याचा व्यवसाय करीत होता. अचानक तो कोरोनाबाधित झाला. त्याला १४ एप्रिल रोजी उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर औषधोपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री तो कोविड सेंटरमधून पळाला. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. अखेरीस नगर परिषद इतवारी प्राथमिक शाळेलगत तो मृतावस्थेत आढळून आला. नगर पालिका कर्मचारी आणि कुटुंबातील काही सदस्यांनी योग्य खबरदारी घेत त्याचा अंत्यविधी पार पाडला. राजेशच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे. तो कर्ता असल्याने त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

सुरक्षित बॉडी किटची कमतरता

शनिवारी सकाळच्या सुमारास कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर अंत्यविधी उरकविण्यासाठी सुरक्षित बॉडी किटच उपलब्ध नव्हती. ग्रामीण रुग्णालयाचा थातूरमातूर आणि बोलबच्चन कारभार पुन्हा एकदा या घटनेमुळे चव्हाट्यावर आला. त्यानंतर लागलीच नगर पालिकेने शनिवारी तातडीने ४० सुरक्षित बॉडी किट बोलाविल्या आणि अंत्यविधी पार पाडला.

एकमेव शववाहिका

कोरोना तथा अन्य कारणांमुळे दररोज मृत्यूसंख्या वाढत आहे. अशावेळी भगतसिंग नागरी पतसंस्था आणि स्वरगंधा सांस्कृतिक संस्थेच्या वतीने केवळ एकमेव शववाहिकेची सेवा उमरेड येथे सुरू आहे. सुमारे १० वर्षांपासून सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेच्या नियोजनाची सध्या त्रेधा उडत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांना नगर पालिकेचे कर्मचारी संबंधित कुटुंबाच्या सहकार्याने अंत्यविधी उरकवण्यासाठी मोलाचे सहकार्यसुद्धा करीत आहेत. अनिल येवले यांच्या नेतृत्वात मोनल डहाके, पवन उराडे, रवी उपाध्याय, वृषभ हुमणे, गजू नंदनवार, दिलीप रंगारी ही चमू हे दायित्त्व पार पाडत आहेत.

रुग्णवाहिकाही कमीच

उमरेड येथून रुग्णांना नागपूरला वा अन्य ठिकाणी तातडीने औषधोपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिकेची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशावेळी मोजक्याच रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याने अनेकांचे हाल बेहाल होत आहेत. ५० हजार लोकसंख्या ओलांडलेल्या उमरेड नगरीत आरोग्य यंत्रणा अद्याप उत्तम सेवा प्रदान करू शकत नाही, याबाबत संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.