‘कोविड -१९’ हा फुफ्फुसाचा आजार होय
कोरोनाचे रुग्ण संक्रमणास मात देण्याची सुरुवात करू शकतात. गंभीर लक्षणे असणारे संक्रमित रुग्ण बरे झाल्यावरही पुढची काही वर्षे आरोग्यासंबंधी कठीण परिस्थितीला हाताळता येऊ शकते. कोविड-१९ किंवा कोरोना हा मुख्यत्वे फुफ्फुसाचा आजार आहे. फुफ्फुसात वायूची पिशवी असते. यात द्रव्य भरले असते. संक्रमणामुळे ऑक्सिजन घेण्याच्या क्षमतेला मर्यादा येतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास, खोकला आदी लक्षणे दिसून येतात. नागपूर चेस्ट सेंटर आणि रेस्पीरा हॉस्पिटलचे सिनियर पल्मोनोलॉजिस्ट डॉ. विक्रांत देशमुख यांनी कोरोना संक्रमणासंदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन केले आहे. कोरोना संक्रमण कशा तऱ्हेने फुफ्फुसाला बाधित करतो आणि नंतर कशा तऱ्हेने बरे होऊ शकतो, ही माहिती देशमुख यांनी दिली. कोरोना संक्रमणातून बरे होण्यास कारणीभूत घटकांमध्ये फुफ्फुसातील फायब्रोसिसचा समावेश होतो. प्रारंभिक अवस्थेत फुफ्फुसाचे नुकसानच होते. फुफ्फुसात जळजळ होत असल्याने आयुष्याचा गुण स्तर खाली येतो. या संदर्भात विस्तारपूर्वक माहिती देत देशमुख यांनी बचावाचे उपचारही सांगितले.
नागपूर चेस्ट सेंटर आणि रेस्पिरा हॉस्पिटलने फुफ्फुसातील फायब्रोसिस नंतर कोरोनातून बचावलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याचे डॉ. विक्रांत देशमुख यांनी सांगितले. अशा रुग्णांवर उत्तमातील उत्तम उपचार येथे केले जाते. स्थिती गंभीर होण्यापूर्वीच बचावात्मक उपाय म्हणून वेळीच तपासणी करून उपचारास सुरुवात करण्याचा सल्ला डॉ. देशमुख यांनी दिला.
-------------
प्रमुख मुद्दे
* आयपीएफ म्हणजेच इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस फुफ्फुसाच्या आकुंचनाचा आजार आहे. यातील रिस्क फॅक्टर कोरोना संक्रमणाशी मिळतेजुळते आहेत. फुफ्फुसातील आकुंचन पुढे वाढू नये म्हणूनच इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसवर उपचारच केले जातात. हेच उपचार कोरोना संक्रमणातही फुफ्फुसाचे आकुंचन होऊ नये म्हणून दिले जाऊ शकतात. यात उपयोगात येणाऱी ॲण्टीफायब्रोटिक औषध फुफ्फुसातील आकुंचनाला रोखण्यास मदत करते.
* कोरोनामुळे श्वास घेण्यास अडचण येण्याच्या गंभीर समस्येसोबत श्वसन रोगाच्या एका विस्तृत स्पेक्ट्रमकडे हा आजार जातो.
* एसएआरएस (सार्स)-सीओवी(कोवी-२) संक्रमणानंतर फायब्रोटिक फुफ्फुसाचा आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच, कोरोना महामारीच्या काळात वैश्विक स्तरावर फायब्रोटिक फुफ्फुसाचे आजार होण्याची शक्यता अधिक वाढणार आहे.
* उपलब्ध ॲण्टीफायब्रोटिक थेरपी मध्ये एटियोलॉजीचा विचार न करता व्यापक ॲण्टीफायब्रोटिक गतीविधी सुरू होतात आणि या औषधांना एसएआरएस (सार्स)-सीओवी (कोवी-२) संक्रमणात प्रोफायब्रोटिकमध्ये परिवर्तित करू शकतात.
...........