शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे 
3
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
4
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
5
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
6
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
7
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
8
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
9
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
10
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
11
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
12
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
13
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
14
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
15
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
16
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
17
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
18
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
19
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
20
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू

‘कॉर्निया’मुक्त भारतासाठी ‘मिशन कांबा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:52 IST

‘कॉर्निया’मुळे येणाºया अंधत्वावर नेत्रदानाच्या माध्यमातून मात करणे शक्य झाले आहे. मात्र नेत्रदानाच्या प्रमाणात ‘कॉर्निअल’ अंधत्व आलेल्यांचे प्रमाण खूप जास्त आहे.

ठळक मुद्दे‘सक्षम’ संस्थेचा पुढाकार : सर्वेक्षण करुन दृष्टिबाधितांची माहिती सरकारला देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कॉर्निया’मुळे येणाºया अंधत्वावर नेत्रदानाच्या माध्यमातून मात करणे शक्य झाले आहे. मात्र नेत्रदानाच्या प्रमाणात ‘कॉर्निअल’ अंधत्व आलेल्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे देशात असे नेमके किती बाधित आहेत, याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. यासंदर्भातच नागपुरातील ‘सक्षम’ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेत ‘कांबा’वर (कॉर्निआ अंधत्व मुक्त भारत अभियान) भर दिला आहे. देशभरातील शाखांच्या माध्यमातून सर्वेक्षण करुन दृष्टिबाधितांची नेमकी सखोल माहिती जमा करण्यात येणार आहे.‘कॉर्निया’ खराब झाल्यामुळे अनेकांचे जीवन अंधकारमय होते. परत प्रकाशपेरणीसाठी दुसºया व्यक्तीच्या डोळ्याच्या ‘कॉर्निया’ला बसवावे लागते. मात्र त्यासाठी त्या प्रमाणात नेत्रदानाची आवश्यकता असते. आपल्या देशात नेत्रदानाच्या प्रमाणात अद्यापही हवी तशी वाढ झालेली नाही. दुसरीकडे ‘कॉर्नियल’ अंधत्व आलेल्यांच्या आकडेवारीबाबत विविध संस्था आणि तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. कुणी ही संख्या १२ लाख सांगत आहेत तर कुणी ३५ लाख. त्यामुळे देशात नेमक्या किती जणांना नेत्रदान हवे याबाबत संभ्रम आहे. याबाबतच ‘सक्षम’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. ‘सक्षम’चे देशभरात ३६० जिल्ह्यांत काम चालते. या ‘नेटवर्क’मुळे देशभरात सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.सुरुवातीला ६ जिल्ह्यांत ‘पायलट प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. यात मेहबूबनगर (तेलंगणा), जबलपूर (मध्य प्रदेश), कर्नाल (हरयाणा), जयपूर (राजस्थान), नवी दिल्ली आणि नागपूर या जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. २०२० पर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांत सर्वेक्षण करण्याचा ‘सक्षम’चा मानस आहे. या सर्वेक्षणातील विस्तृत अहवाल केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाला सोपविण्यात येणार आहे. त्यानंतर नेत्रदानाला चालना देण्यासंदर्भात पुढील रुपरेषा तयार करण्याची पावले उचलण्यात येण्याची शक्यता आहे.नेत्रदानाचे प्रमाण वाढण्याची आवश्यकतादेशात नेत्ररोगांचे प्रमाण वेगवेगळे आहे. मात्र याची कुठलीच सखोल आकडेवारी उपलब्ध नाहीत. त्यामुळेच ‘सक्षम’ने सर्वेक्षण करण्याचे पाऊल उचलले आहे. मुळात नेत्रदानाचे प्रमाण फार कमी आहे. ते वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन ‘सक्षम’च्या राष्ट्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य शिरीष दारव्हेकर यांनी केले.