शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; नागपूर जिल्ह्यातील कोराडी मंदिर दर्शनासाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 16:07 IST

शासनाने १३ मार्च रोजी लागू केलेल्या अधिसूचनेनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज (दिनांक १७ मार्च) रात्री आरतीनंतर कोराडी जगदंबा देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात येत असल्याचे मंदिर प्रशासनाने कळविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आला. शासनाने १३ मार्च रोजी लागू केलेल्या अधिसूचनेनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज (दिनांक १७ मार्च) रात्री आरतीनंतर कोराडी जगदंबा देवी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात येत असल्याचे मंदिर प्रशासनाने कळविले आहे. शासनाच्या पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद राहणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी करू नये. तसेच 25 मार्चपासून सुरू होणाºया चैत्र नवरात्र महोत्सवात कोराडी मंदिरात मोठ्या प्रमाणावर होणारी भाविकांची गर्दी पाहता, तसेच राज्यात जमावबंदी कायदा लागू करण्यात आल्यामुळे श्री. महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथील कोराडी मंदिर हे पुढील आदेशापर्यंत दर्शनासाठी बंद करण्यात येत आहे.दरम्यान या कालावधीत महालक्ष्मी जगदंबा मातेची नियमित होणारी पूजा, आरती, होम हवन करण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मंदिरातील पुजारी व कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझर देण्यात आले आहेत. तसेच मंदिर परिसरात स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. भाविकांनी पुढील आदेशापर्यंत दर्शनासाठी येणे टाळावे असे विश्वस्त मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस