शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात कोराडी नवरात्र उत्सव २९ सप्टेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 13:41 IST

कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान परिसरात नवरात्रोत्सव आयोजनासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेसह विविध कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला.

ठळक मुद्देनवरात्रनिमित्त १० लाख भाविकांची उपस्थितीसुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य द्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान येथे नवरात्रोत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार असून संपूर्ण मध्य भारतातून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सुमारे १० लाख भाविकांसाठी सुरक्षेसह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने येत्या दहा दिवसात कामे पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिल्या.कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान परिसरात नवरात्रोत्सव आयोजनासंदर्भात कायदा व सुव्यवस्थेसह विविध कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल प्रामुख्याने उपस्थित होते. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश शर्मा, उपाध्यक्ष अजय विजयवर्गी, सचिव केशवराव फुलझेले महाराज, सुशीला मंत्री, प्रेमलाल पटेल, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते.कोराडी देवस्थान येथे नवरात्रोत्सवाची २९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक उपस्थित राहतात. या उत्सवानिमित्त नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी कोराडी संस्थानतर्फे आवश्यक उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. नवरात्रोत्सवामध्ये येणाºया भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करताना वाहन व्यवस्थासुद्धा पोलीस विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात यावी. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहने येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यानुसार पुरेशी व्यवस्था आवश्यक आहे. याच परिसरात भाविकांसाठी मदत केंद्र, पोलीस चौकी सुरू करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी केल्या. भाविकांना दर्शनासाठी तीन प्रवेशद्वार राहणार आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. संपूर्ण परिसरात महाजेनकोतर्फे पथदिवे, पाच हायमॉस टॉवर आदी बसविण्यात येतील. याच परिसरात चोवीस तास आरोग्य पथक तैनात करण्यात येणार असून अ‍ॅब्युलन्सची सुविधा, भाविकांसाठी चोवीस तास पिण्याचे पाणी, परिसराच्या स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाºयांची नियुक्ती, शौचालय आदी सुविधा कोराडी ग्रामपंचायत, श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान, महानगरपालिका, आरोग्य विभाग, महाजेनको, महसूल विभाग व पोलीस विभागाच्या समन्वयाने पूर्ण करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Navratriनवरात्री