शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोंढाळी, नीलडोह, डिगडोह ग्रामपंचायत निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचा अंतरिम आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 11:45 IST

राज्य सरकार, निवडणूक आयोगाला नोटीस

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी नगर परिषद व नगर पंचायत रुपांतराची प्रक्रिया लक्षात घेता कोंढाळी, नीलडोह व डिगडोह (देवी) या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली आहे. तसेच, नगरविकास विभागाचे सचिव, ग्रामविकास विभागाचे सचिव, राज्य निवडणूक आयोग व ग्रामपंचायत सचिवांना नोटिसा बजावून यावर येत्या मंगळवारपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

नगरविकास विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्याेगिक वसाहती कायद्यातील कलम ३४१(ए) अंतर्गतच्या अधिकारानुसार डिगडोह ग्रामपंचायतचे नगर परिषद, तर कोंढाळी, नीलडोह व बिडगाव-तरोडी (खुर्द) ग्रामपंचायतचे नगर पंचायतमध्ये रूपांतर करण्यासाठी २१ जून, ११ ऑगस्ट व ३१ ऑगस्ट रोजी मसुदा अधिसूचना जारी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी १४ ऑगस्ट व २५ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाला पत्र पाठवून यावर कोणालाही आक्षेप नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे या चारही ग्रामपंचायतींना संबंधित वरिष्ठ दर्जा देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. असे असताना राज्य निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर रोजी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

परिणामी, काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष चरणसिंग ठाकूर, बालकिसन पालिवाल व श्यामराव तायवाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सलील देशमुख व केशव धुर्वे यांनी कोंढाळी, तर आमदार समीर मेघे यांनी सरपंच वनिता गडमाडे यांच्यासोबत मिळून नीलडोह आणि सरपंच इंद्रायणी काळबांडे यांच्यासोबत मिळून डिगडोह ग्रामपंचायत निवडणुकीविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकांवर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. मोहित खजांची, ॲड. महेश धात्रक व ॲड. रितेश दावडा यांनी कामकाज पाहिले.

नगरविकासचे आयोगाला पत्र

५ ऑक्टोबर रोजी नगरविकास विभागाच्या सचिवांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना पत्र पाठवून संबंधित वरिष्ठ दर्जाची अंतिम अधिसूचना जारी होईपर्यंत या चारही ग्रामपंचायतींची निवडणूक घेऊ नका, अशी विनंती केली आहे. त्यावर निर्णय व्हायचा आहे. परिणामी, उच्च न्यायालयाने हा अंतरिम आदेश दिला.

‘लोकमत’ने वेधले होते लक्ष

नगर परिषद व नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या चारही ठिकाणी ग्रामपंचायत निवडणूक का, असा प्रश्न ‘लोकमत’ने उपस्थित करून याकडे जिल्हा प्रशासन व राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले होते. तसेच, आता ग्रामपंचायत निवडणूक घेतल्यास काही दिवसाने नगर परिषद व नगरपंचायत निवडणूक घ्यावी लागेल. परिणामी, अतिरिक्त सार्वजनिक निधी खर्च होईल. सरकारी यंत्रणेची ऊर्जा व वेळ वाया जाईल, असा दावा केला होता.

बीडगाव-तरोडीचे काय?

बीडगाव-तरोडी ग्रामपंचायत निवडणुकीविरुद्ध कोणीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली नाही. त्यामुळे या निवडणुकीला अंतरिम स्थगिती मिळाली नाही. या परिस्थितीत नागरिकांपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या ग्रामपंचायतीची निवडणूक होईल की नाही, अशी विचारणा एकमेकांना केली जात आहे.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक