शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

जाणून घ्या, तुमचे ‘लॉकर’ खरंच किती सुरक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 09:47 IST

नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये चोरट्यांनी भुयार खणून ३.२८ कोटीचा ऐवज लुटून नेल्यानंतर लॉकरच्या सुरक्षेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. यासंबंधी रिझर्व्ह बँकेचे नियम जाणून घेण्यासाठी लोकमतने रिझर्व्ह बँकेच्याच एका सेवानिवृत्त मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व त्यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती वाचकांसाठी देत आहोत.

ठळक मुद्देकाय आहेत रिझर्व्ह बँकेचे नियम?

सोपान पांढरीपांडे।आॅनलाईन लोकमतनागपूर : नवी मुंबईच्या जुईनगरमध्ये चोरट्यांनी भुयार खणून बँक आॅफ बडोदाच्या लॉकर रूममध्ये प्रवेश करून ३.२८ कोटीचा ऐवज लुटून नेल्यानंतर लॉकरच्या सुरक्षेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. यासंबंधी रिझर्व्ह बँकेचे नियम जाणून घेण्यासाठी लोकमतने रिझर्व्ह बँकेच्याच एका सेवानिवृत्त मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व त्यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती वाचकांसाठी देत आहोत. हल्ली रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे बनविलेल्या लॉकर रूम्स भारतातही तयार होतात. त्यात गोदरेज, येल, ओझोन, स्टील एज, रोलेक्स, मीरा अरबिंदो या कंपन्या आघाडीवर आहेत.

लॉकरधारकांनी काय करावे?लॉकरचा व्यवसाय हा पतसंस्था/नागरी सहकारी बँका/  बँका/खासगी बँका यासाठी दुहेरी फायद्याचा असतो. कारण लॉकरसाठी या सर्व संस्थांना ग्राहकांकडून ठेवी मिळतात व लॉकरचे भाडेही मिळते. त्यामुळे बहुसंख्य पतसंस्था, नागरी बँका, सरकारी व खासगी बँका व खासगी कंपन्या लॉकरचा व्यवसाय करतात अशी माहिती सहकारी बँकांचे कन्सल्टंट दिलीप मुलमुले यांनी दिली. लॉकरधारकांनी आपल्या पतसंस्थेने/बँकेने अथवा लॉकर कंपनीने हे नियम पाळले आहेत की नाही याची त्वरित शहानिशा करावी व उचित निर्णय घ्यावा, असे आवाहनही मुलमुले यांनी केले.

रिझर्व्ह बँकेचे स्ट्राँगरूम व लॉकर रूमसाठी नियम-स्ट्राँग रूम/लॉकर रूमसाठी निवडलेल्या जागेला तिन्ही बाजूंनी सिमेंट काँक्रिटच्या भिंती बांधून मुख्य इमारतीपासून वेगळे करणे आवश्यक आहे. शिवाय लॉकर रूमचा तळ सिमेंट अथवा १८ मि.मी. लोखंडी प्लेटचा असणे आवश्यक आहे.सिमेंट काँक्रिटच्या या भिंतीची जाडी कमीत कमी एक फूट असणे आवश्यक आहे.स्ट्राँग रूम/लॉकर रूमचा दरवाजा १ मीटर (३.२५ फूट) पेक्षा अधिक नको व दरवाजाला दोन्हीकडून सरकत जाणारी लोखंडी ग्रिल असणे आवश्यक आहे. हा दरवाजा फक्त २१ इंच उघडा ठेवावा व एकावेळी एकच व्यक्ती आत/बाहेर जाऊ शकेल.लॉकर रूमचा दरवाजा जनतेला दिसणार नाही असा झाकलेला असावा.लॉकर रूममध्ये बँक अधिकारी व ग्राहक अशा दोनच व्यक्ती एकावेळी उपस्थित असाव्यात. लॉकर दोन चाब्यांनी उघडणारे असावे. यापैकी एक चाबी ग्राहकाकडे व दुसरी बँकेकडे असावी. संपूर्ण लॉकर रूममध्ये अलार्म सिस्टिम असणे व तिचा आवाज १ कि.मी. पर्यंत ऐकू येणे आवश्यक आहे.लॉकर रूम असणाऱ्या इमारतीत आत व बाहेर सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे.संपूर्ण इमारतीसमोर सशस्त्र सुरक्षा रक्षक २४ तास असणे आवश्यक आहे.लॉकरचा आकार अ श्रेणीसाठी ४.५ इंच ५.७५ इंच २०.७५ इंच तर छ/ङ श्रेणीसाठी १५.५ इंच १९.७५ इंच २०.७५ इंच असावा. लॉकर रूम वेगळी असेल तर तळ व बाजूच्या भिंती व दरवाजा १८ मिमी लोखंडी प्लेटचा असणे आवश्यक.

कडक नियम का?इंडियन कॉन्ट्रॅक्ट अ‍ॅक्टच्या कलम १५२ प्रमाणे लॉकरच्या बाबतीत बँक/लॉकर कंपनी व ग्राहक यांचे नाते घरमालक व भाडेकरूचे निश्चित केले आहे. त्यामुळे लॉकर फोडून चोरी झाली तरी ग्राहकाच्या नुकसानीसाठी बँक/लॉकर कंपनी जबाबदार नसते. म्हणून चोरी होऊच नये म्हणून एवढे कडक सुरक्षा नियम रिझर्व्ह बँकेने घालून दिले आहेत, अशी माहिती वर्धमान नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व चार्टर्ड अकाऊंटंट अनिल पारख यांनी दिली.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक