बकरामंडीच्या कत्तलखान्यात माणसावर चालला चाकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:06 IST2021-07-05T04:06:19+5:302021-07-05T04:06:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बकरामंडीच्या कत्तलखान्यात वाद झाल्यानंतर दोन आरोपींनी एकावर चाकूने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. ...

A knife was run over a man in Bakramandi's slaughterhouse | बकरामंडीच्या कत्तलखान्यात माणसावर चालला चाकू

बकरामंडीच्या कत्तलखान्यात माणसावर चालला चाकू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बकरामंडीच्या कत्तलखान्यात वाद झाल्यानंतर दोन आरोपींनी एकावर चाकूने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. शनिवारी सकाळी ११.४५ ला ही घटना घडली. महेंद्र ऊर्फ मुरली नीळकंठ ढोके (३५) असे जखमीचे नाव आहे.

ढोके आणि त्याचा चुलत पुतण्या बाल्या ऊर्फ शुभम शेषराव कटारे (२५, रा. गोंडपुरा, पाचपावली) तसेच नितेश मोतीलाल दुर्गे (वय ३२, रा. ठक्करग्राम, पाचपावली) हे तिघे मोमिनपुऱ्यातील बकरामंडी कत्तलखान्यात काम करतात. शनिवारी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. यानंतर आरोपी बाल्या कटारेने धारदार चाकूने ढोकेवर हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केले तर आरोपी नितेशने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेमुळे एकच खळबळ निर्माण झाली. इतरांनी धाव घेऊन आरोपींच्या तावडीतून ढोकेंना वाचविले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. माहिती मिळाल्यानंतर तहसील पोलिसांनी ढोकेंचे बयान नोंदवले. त्यावरून आरोपी बाल्या आणि नितेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

----

Web Title: A knife was run over a man in Bakramandi's slaughterhouse