शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात धावत्या दुचाकीवरून चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 21:51 IST

घराकडे जात असलेल्या जेसीबी चालकावर दोन आरोपींनी धावत्या दुचाकीवरून चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा मार्गावर बुधवारी रात्री ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घराकडे जात असलेल्या जेसीबी चालकावर दोन आरोपींनी धावत्या दुचाकीवरून चाकूहल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा मार्गावर बुधवारी रात्री ही घटना घडली. प्रकाश तुकाराम पाडगावकर (४३) हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले.शारदा चौकाजवळच्या भवानी नगरात पाडगावकर राहतात. ते जेसीबी चालक आहेत. बुधवारी रात्री ८.४० च्या सुमारास दुचाकीवरून ते आपल्या घराकडे जात होते. भरतवाडा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या गायत्री डेअरीजवळ मागून दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी त्यांच्या पाठीवर चाकूचे वार केले आणि त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पाडगावकर गंभीर जखमी झाले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यामुळे बाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. जखमी पाडगावकर यांना मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. माहिती कळताच कळमना पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी पाडगावकर यांचे बयाण नोंदवून घेतले. हल्ला करणाऱ्याला आपण ओळखत नसल्याचे पाडगावकर यांनी पोलिसांना सांगितले. हा प्राणघातक हल्ला कोणत्या कारणावरून झाला, ते उघड झाले नाही. कळमना पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अज्ञात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर