शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
5
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
6
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
7
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
8
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
9
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
10
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
11
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
12
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
13
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
14
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
15
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
16
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
17
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
18
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
19
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
Daily Top 2Weekly Top 5

किचन हीच आपली फार्मसी (२)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST

- जागतिक आरोग्य दिन : व्यायाम शरीरासाठी आवश्यक नागपूर : रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे हे कोविडने सर्वांना शिकविले आहे. आहारासाठी ...

- जागतिक आरोग्य दिन : व्यायाम शरीरासाठी आवश्यक

नागपूर : रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे हे कोविडने सर्वांना शिकविले आहे. आहारासाठी चांगले जेवण आणि नियमित व्यायामाने रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनापासून वाचू शकतो. स्वत:ला फिट ठेवायचे असेल तर किचन हीच आपली फार्मसी असल्याचे मत आहारतज्ज्ञांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त व्यक्त केले आहे. कोरोनावर मात करायची असेल तर बाहेरील प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांऐवजी घरचे जेवण केव्हाही सर्वोत्तम असल्याचे त्यांनी सांगितले.

आहारतज्ज्ञ डॉ. अपूर्वा अग्रवाल म्हणाल्या, प्रथिने शरीरासाठी चांगली असतात. ते शाकाहारीपेक्षा मांसाहारी पदार्थातून जास्त मिळतात. त्यामुळे शाकाहारी असणाऱ्यांना मल्टीव्हिटॅमिनची जास्त गरज असते. प्रत्येकाला दररोज ११०० ते १३०० कॅलरीजची गरज असते. हे सर्व दिवसभरात ५०० ग्रॅम जेवण आणि एक तासाच्या व्यायामातून मिळते. मल्टीव्हिटॅमिन बी१२ वयस्कांसाठी १००० ते १५०० एमजी, लहान मुलांसाठी ५०० एमजी आवश्यक असते. बी१२ इम्युनिटी बूस्टर असते. वयस्कांना व्हिटॅमिन डी २००० आयव्ही व लहानांसाठी १००० आयव्ही, वयस्कांना व्हिॅटमिन-सी १००० एमजी व लहानांना ५०० एमजी, १० ते २० एमजी व लहानांना ५ एमजीची गरज असते. भाजीपाला जास्त तर मसाले कमी प्रमाणात घ्या, दैनंदिन कामात व्यस्त राहा, असा सल्ला त्यांनी दिला.

आहारतज्ज्ञ जयश्री पेंढरकर म्हणाल्या, लोकांचे खानपान बदलल्याने लोकांची प्रतिकारशक्ती निष्क्रिय झाल्याचे कोविड आजारात दिसून येत आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आठ पोषकतत्त्वांची शरीराला अत्यंक आवश्यकता असते. विषाणू नष्ट करणारे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि झिंकची गरज आहे. हे सर्व भाजीपाला, फळे, ड्राय फ्रूट, शेंगदाणा आणि घाणीच्या तेलातून मिळते. आहार ही जीवनपद्धती व्हावी. प्रक्रिया केलेल्या बाहेरील अन्नपदार्थांचे सेवन करू नये. प्रक्रियेमुळे पोषकतत्त्वे नष्ट होतात. थिंक ग्लोबली, थिंक लोकली, अशी विचारसरणी असावी. जेवणात दररोज ४० अन्नघटक अर्थात १४ क्षार, १५ व्हिॅटमिन आणि एक फॅटी अ‍ॅसिडचा समावेश असायला हवा. कोविडनंतर सर्वजण जागृत झाले आहेत. इम्युनिटी डाएटवर भर दिला जात आहे. अन्न नैसर्गिक स्रोतात घ्यावे. कोविडने सर्वांना आहारपद्धती शिकविली आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने त्याचा सर्वांना अवलंब करावा.

कोविडनंतर स्टार्टअपच्या संधी

कोविडनंतर अन्नपदार्थ प्रक्रिया उद्योगाच्या स्टार्टअपवर जास्त भर दिला जात आहे. अनेकांनी अशाच प्रकारचे स्टार्टअप सुरू केले आहे. या व्यवसायाला आता सुगीचे दिवस आले आहेत. इम्युनिट बूस्टर डाएटवर लोकांचा भर असल्याने प्रथिनेयुक्त आणि पौष्टिक पदार्थांची रेलचेल वाढली आहे.