शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राजा, राणी व राजकुमारही ठरले राजभवनचे गुलाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 23:36 IST

गोष्ट फुलांची केली आणि गुलाबाचा उल्लेख होणार नाही तर नवलचं. गुलाब पुष्पाचे लोभसवाणे रूप कुणालाही आकर्षित करणारे. म्हणून सौंदर्यवतीच्या सौंदर्यालाही गुलाबाची उपमा आणि राजबिंड्या राजाच्या रुबाबदार रूपालाही गुलाबाच लेणं. तर या पुष्पराजाचा विषय निघण्यासाठी कारण ठरले ते दहाव्या अ‍ॅग्रोव्हिजन प्रदर्शनामध्ये असलेल्या फ्लॉवर शोच्या निमित्ताने. या शोमध्ये लक्ष वेधत होते ते विविध प्रकारातील गुलाबपुष्प. यातही भाव खावून गेले ते राजभवनतर्फे ठेवलेले गुलाब. गुलाबाचा राजा, गुलाबाची राणी आणि गुलाब राजकुमार हे तिन्ही पुरस्कार राजभवनच्या गुलाबपुष्पांनी मिळविले.

ठळक मुद्देअ‍ॅग्रोव्हिजन प्रदर्शनात फ्लॉवर शो

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोष्ट फुलांची केली आणि गुलाबाचा उल्लेख होणार नाही तर नवलचं. गुलाब पुष्पाचे लोभसवाणे रूप कुणालाही आकर्षित करणारे. म्हणून सौंदर्यवतीच्या सौंदर्यालाही गुलाबाची उपमा आणि राजबिंड्या राजाच्या रुबाबदार रूपालाही गुलाबाच लेणं. तर या पुष्पराजाचा विषय निघण्यासाठी कारण ठरले ते दहाव्या अ‍ॅग्रोव्हिजन प्रदर्शनामध्ये असलेल्या फ्लॉवर शोच्या निमित्ताने. या शोमध्ये लक्ष वेधत होते ते विविध प्रकारातील गुलाबपुष्प. यातही भाव खावून गेले ते राजभवनतर्फे ठेवलेले गुलाब. गुलाबाचा राजा, गुलाबाची राणी आणि गुलाब राजकुमार हे तिन्ही पुरस्कार राजभवनच्या गुलाबपुष्पांनी मिळविले.या फ्लॉवर शोमध्ये शहरातील जवळपास ५०० शासकीय, अशासकीय संस्था, खासगी नर्सरीचालक व पुष्प संगोपन करणाऱ्या नागपूरकरांनी सहभाग घेतला आहे. गुलाब पुष्पांच्या सर्वाधिक २५० प्रवेशिका येथे आलेल्या आहेत. मात्र लक्ष वेधले ते राजभवनतर्फे ठेवलेल्या गुलाब पुष्पांनी. राजभवन म्हणजे शहराच्या मध्यभागी असलेले देशातील सर्व अति महत्त्वाच्या व्यक्तींचे निवासस्थान. या राजभवनमध्ये प्रभारी अधिकारी रमेश येवले यांच्या पुढाकाराने सुंदर असे गुलाब पुष्प उद्यान निर्माण झाले, ज्यामध्ये गुलाबाच्या जवळजवळ २५० प्रजातींची १७५० रोपटी लावण्यात आली होती. जुनी झालेली पूर्वीची रोपटे काढून यावर्षी आॅगस्ट महिन्यात नव्याने तेवढ्याच रोपट्यांची लागवड करण्यात आली. याच गुलाब उद्यानातील पहिल्या बहरातील गुलाबांचा समावेश या फ्लॉवर शोमध्ये करण्यात आला. आतापर्यंत केवळ अतिविशिष्ट व्यक्तींना मोहित करणाऱ्या या फुलांनी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांची मने जिंकली आणि मनासोबत बक्षिसेही जिंकली. पहिल्या तिन्ही क्रमांकासह १८ बक्षिसे राजभवनच्या गुलाब फुलांनी जिंकली.

 

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर