शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील बैद्यनाथ चौक भागात कुख्यात गुंडाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:17 IST

इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतील बैद्यनाथ चौकात कुख्यात गुंड बादल गजभिये याची हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री १०.३० वाजता घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा गँगवॉर भडकले असून परिसरात दहशत पसरली आहे.

ठळक मुद्देपुन्हा गँगवार भडकले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीतील बैद्यनाथ चौकात कुख्यात गुंड बादल गजभिये याची हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री १०.३० वाजता घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा गँगवॉर भडकले असून परिसरात दहशत पसरली आहे.२७ वर्षीय बादलच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. इमामवाडा परिसरात त्याचा दबदबा होता. रात्री १०.३० वाजता बैद्यनाथ चौकातील कामगार भवनाच्या मागच्या बाजूला हल्लेखोरांनी बादलला घेरले. त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले.घटनेची माहिती होताच परिसरातील लोकांनी गर्दी केली. पोलिसांनाही सूचना देण्यात आली. झोन-४चे डीसीपी रोशन राजतिलक आणि इमामवाडा पोलीस घटनस्थळी पोहोचले. पोलिसांनी बादलला मेडिकलमध्ये दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांना घटनास्थळी मिरची पावडर सापडली आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. अनेक गुंडांसोबत बादलचे वैमनस्य होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस आरोपीची धरपकड करीत होते.मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर २०१५ मध्ये बादलचे वडील राजू यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी बादलने चुनाभट्टी भागात २०१६ मध्ये सौरभ अलोणी याच्यावर हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला होता. या घटनेचा बदला म्हणून बादलची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे इमामवाडा-रामबाग परिसरात पुन्हा गँगवॉर भडकल्याचे बोलले जाते.तासभर मृतदेह पडूनबैद्यनाथ चौकात खून करण्यात आला. लोकांनी गर्दी केली. येथून हाकेच्या अंतरावरच इमामवाडा पोलीस ठाणे आहे. परंतु पोलीस तासभर उशिरा पोहोचले. त्यामुळे तासभर मृतदेह तसाच पडून होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून