शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची वेशभुषा करून अल्पवयीन मुलीचे अपहरण, पैशांचे आमिष दाखवून नेले मुंबईला

By दयानंद पाईकराव | Updated: October 14, 2023 15:34 IST

कारवाईच्या भितीने पाठविले परत

नागपूर : मुंबईला हॉटेलमध्ये डान्स केल्यास भरपूर पैसे मिळतात, अशी बतावणी करून मुलीची वेशभुषा केलेल्या एका आरोपीने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. परंतु मुंबईत पोलिसांची धाड पडल्यामुळे आरोपीने मुलीला विमानात बसवून नागपुरात पाठविले. या प्रकरणी अपहरण करणाऱ्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ ऑक्टोबरला फिर्यादीची १३ वर्षीय बहिण शाळेतून घरी न परतल्यामुळे हुडकेश्वर पोलिसांनी कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने मुलीचा शोध घेतला असता तिच्या शाळेतील मैत्रीणीने ती जॉबसाठी मुंबईला जाणार असल्याची माहिती दिली. अल्पवयीन मुलीजवळ मोबाईल असल्यामुळे तिचे लोकेशन तपासून पाळत ठेवण्यात आली. अखेर १३ ऑक्टोबरला मुलगी परत आली. आपल्यासोबत कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याची माहिती तिने दिली. पोलिस फुस लाऊन पळवून नेणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.मुलीच्या वेशात मुलाने मुंबईला आणल्याचे समजताच बसला धक्का

मुलीच्या वेशभुषेत असलेल्या मुलाने अल्पवयीन मुलीला आर्थिक प्रलोभन दाखवून मुंबईला नेल्यानंतर ठाणे येथे ठेवले. त्यानंतर आरोपी आपल्या कामाला गेला. तेथे राहणाऱ्या एका मुलीने अल्पवयीन मुलीला तिच्यासोबत असलेली मुलगी नव्हे तर मुलगा असून तो वेटरचे काम करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे अल्पवयीन मुलीला धक्काच बसला. त्यानंतर पोलिसांची धाड पडल्यामुळे आरोपी तेथे परतला. कारवाईच्या भितीमुळे त्याने मुलीला नागपूरला येणाऱ्या विमानात बसवून दिले आणि या प्रकाराची कुणालाही माहिती देऊ नको, अशी धमकी दिली.

अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने मुलीची वैद्यकीय तपासणी करून तिला हुडकेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ, उपनिरीक्षक मंगला हरडे, सुनिल वाकडे, दिपक बिंदाने, अशरीफ शेख, विलास चिंचुलकर, अश्विनी खोडपेवार यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणnagpurनागपूर