शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चाकूच्या धाकावर अपहरण : २० लाखांची खडणी मागितली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 20:53 IST

धरमपेठमधील एका दुकानाच्या व्यवहारातून वाद निर्माण झाल्यामुळे आपले आणि आपल्या मुलाचे ६ ते ७ आरोपींनी चाकूच्या धाकावर अपहरण करून २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार एका व्यक्तीने पोलिसांकडे नोंदविली आहे.

ठळक मुद्देधरमपेठमधील दुकानाचा वाद : ११ हजार हिसकावून नेले : सदरमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धरमपेठमधील एका दुकानाच्या व्यवहारातून वाद निर्माण झाल्यामुळे आपले आणि आपल्या मुलाचे ६ ते ७ आरोपींनी चाकूच्या धाकावर अपहरण करून २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार एका व्यक्तीने पोलिसांकडे नोंदविली आहे.२ मे २०१९ ते २७ फेब्रुवारी २०२० यादरम्यान घडलेल्या या प्रकाराची तक्रार घेऊन पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. गौरव दिलीप दाणी (वय ३८) असे तक्रार नोंदविणाऱ्याचे नाव आहे. दाणी मयूरेश अपार्टमेंट विनायकनगर, एमआयडीसी येथे राहतात. दाणी यांच्या तक्रारीनुसार, त्यांची भगवाघर ले-आऊट धरमपेठमध्ये शिवगौरव इस्टेट ही वडिलोपार्जित मालमत्ता आहे. यातील एका दुकानाच्या व्यवहारातून आरोपींसोबत त्यांचा वाद सुरू होता. या मालमत्तेतील दुकान आपल्याला देण्यात यावे, यासाठी अनेकदा त्यांच्यात भांडणही झाले. या पार्श्वभूमीवर, आरोपी अंकित पाली, रोशन शेख अभिषेक व त्यांच्या तीन ते चार साथीदारांनी २ मे २०१९ ते २७ फेब्रुवारी २०२० या दरम्यान सदरमधील मोती महाल रेस्टॉरन्ट येथून दाणी यांना चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने वाहनात बसविले. त्यांना आणि त्यांच्या मुलाला जीव घेण्याची भीती दाखवून २० लाख रुपये खंडणीची मागणी केली.ज्या दुकानाचा वाद सुरू आहे, ते दुकान आपल्या सुपूर्द करावे, यासाठी आरोपींनी दाणी यांच्या मानेवर व छातीवर चाकू लावला तसेच त्यांच्या खिशातील ९ ते ११ हजार रुपये हिसकावून घेतले. आरोपींनी आपल्याला अनेकदा मारहाण करून खंडणीची मागणी केली, असेही दाणी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी शुक्रवारी सदर पोलिस ठाण्यात जाऊन अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देणे आणि खंडणीची मागणी करणे तसेच ९ ते ११ हजार रुपये हिसकावून घेणे, अशा आरोपावरून विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, सदर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याविषयी माहिती विचारली असता पोलिसांनी हे प्रकरण थेट गुन्हे शाखेकडून दाखल झाल्यामुळे आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले.विलंबाचे कारण अंधारात२ मे २०१९ ते २७ फेब्रुवारी २०२० या दरम्यान हा गुन्हा घडल्याचे दाणी यांनी तक्रारीत नमूद केले आहे. मात्र हा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी एवढा विलंब का लावला, याबाबत माहिती देण्यास पोलिस टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे या प्रकरणातील संशय वाढला आहे.

कुख्यात रोशन शेखला अटक

२० लाख रुपयाच्या खंडणी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार रोशन शेख असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याची शोधाशोध करून ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून शनिवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, रोशन याने अनेक जणांना ब्लॅकमेल केल्याचीही माहिती पुढे आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ चे प्रमुख, पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :Kidnappingअपहरणnagpurनागपूर