शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

नागपुरात साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:31 IST

घराशेजारी राहणाऱ्या एका आरोपीने साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण केले. तो रडत असल्याने गप्प करण्यासाठी या निरागस बालकाला मारहाणही केली. मोखारे कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाचे वेळीच लक्ष गेल्यामुळे त्याने आरोपीला हटकले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. चिमुकल्याला तेथेच सोडून आरोपी पळून गेला. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी ४ ते ४.३०च्या सुमारास सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमोठा अनर्थ टळला : आरोपी फरार, सोनेगाव पोलिसांची शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घराशेजारी राहणाऱ्या एका आरोपीने साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण केले. तो रडत असल्याने गप्प करण्यासाठी या निरागस बालकाला मारहाणही केली. मोखारे कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाचे वेळीच लक्ष गेल्यामुळे त्याने आरोपीला हटकले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. चिमुकल्याला तेथेच सोडून आरोपी पळून गेला. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी ४ ते ४.३०च्या सुमारास सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.नैतिक नितीन सायरे असे अपहृत बालकाचे नाव आहे. त्याचे वडील खासगी काम करतात तर आई वंदना गृहिणी आहे. नैतिकला एक बहीण आहे. हा परिवार स्वावलंबीनगरातील मनीषनगर लेआऊटमध्ये राहतो. बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास नैतिक खेळता खेळता गेटबाहेर गेला. ही संधी साधून आरोपी शेखर बालाजी जाधव (वय २३, रा. न्यू पिरॅमिड सिटीसमोर, नागपूर) याने चिमुकल्या नैतिकचे अपहरण केले. त्याला त्याने मोखारे कॉलेजजवळ नेले. अनोळखी शेखर जबरदस्तीने घेऊन पळत असल्याने चिमुकला नैतिक घाबरला होता. त्यामुळे तो रडू लागला. आरोपीने त्याचे तोंड दाबून त्याला गप्प करण्याचा प्रयत्न झाला. तो ऐकत नसल्याचे पाहून त्या चिमुकल्याच्या गालावर थापडा मारल्या. हा प्रकार पाहून मोखारे कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाला संशय आला. त्यांनी आरोपी शेखरला हटकले. त्यामुळे आरोपीने नैतिकला तेथेच सोडून पळ काढला. सुरक्षा रक्षकाची आरडाओरड ऐकून कॉलेजमधील कर्मचारी बाहेर आले. त्यातील प्रणाली राऊत नामक महिला सायरे यांच्या शेजारी राहत असल्याने त्यांनी नैतिकला ओळखले. त्यांनी लगेच नैतिकच्या आई वंदना यांना फोन करून कॉलेजच्या जवळ नैतिक रडत असल्याची माहिती दिली. परिणामी सायरे कुटुंबीय लगेच तेथे पोहचले. त्यांनी चिमुकल्या नैतिकला जवळ घेतल्यानंतर त्याचे अपहरण झाले होते, हे उघड झाले. अपहरण करणारा आरोपी शेखरने त्याला मारहाण केल्याचेही त्याच्या गालावरच्या ओरबडल्यावरून दिसत होते. वंदना सायरे यांनी सोनेगाव पोलिसांकडे तक्रार नोंदवली.तीव्र संतापाचे वातावरणचिमुकल्याचे अपहरण झाल्याची वार्ता परिसरात वायुवेगाने पोहचली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अनेकांनी सायरेंच्या घरासमोर आणि नंतर सोनेगाव ठाण्यात गर्दी केली.निरागस बालकाला आरोपीने मारहाणही केल्याचे कळाल्याने तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेत लगेच आरोपीची शोधाशोध सुरू केली. त्याच्या घरी पोलीस पथक पोहचले असता तो तीन ते चार दिवसांपासून घरी आलाच नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.आजूबाजूच्यांनी नेताना बघितलेआरोपी शेखर जाधव हा सायरे यांच्या घराजवळच राहत होता. नुकतेच त्याच्या कुटुंबीयांनी बेसा परिसरात घर बांधल्याने तो परिवारासह तिकडे राहायला गेला. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी शेखर गुन्हेगारी वृत्तीचा आहे. तो रोजगाराच्या निमित्ताने पुण्याला गेला होता. राखीच्या निमित्ताने नागपूरला आला आणि त्याने चिमुकल्याच्या अपहरणासारखा गंभीर गुन्हा केला. नैतिकला उचलून स्कुटीवर नेताना त्याला आजूबाजूच्यांनी बघितले होते. त्यावेळी तो अपहरणासारखा गुन्हा करीत आहे, अशी कल्पनाही कुणी केली नाही. लाडाने घेऊन जात असावे, असे शेजाºयांना वाटले. त्याने घरापासून एक ते दोन किलोमीटर दूर अंतरावर मारहाण करून नैतिकला सोडले आणि पळ काढल्याने हा अपहरणाचा प्रकार असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. दरम्यान, नैतिक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. त्यामुळे त्याच्या अपहरणामागे आरोपीचा नेमका कोणता उद्देश होता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपीच्या अटकेनंतरच त्याचा खुलासा होणार आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण