शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

भिसीचा हप्ता न भरल्यामुळे नागपुरात अपहरण : चार आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:53 IST

भिसीचा मासिक हप्ता न भरल्यामुळे एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना पाचपावली येथील अशोक चौकात घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून व्यापारी बंधूंसह चार आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्देपाचपावली भागातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भिसीचा मासिक हप्ता न भरल्यामुळे एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना पाचपावली येथील अशोक चौकात घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून व्यापारी बंधूंसह चार आरोपींना अटक केली आहे. प्रवीण दरयानी (३९), त्याचा भाऊ रवी दरयानी (३२), निर्मलसिंग ऊर्फ बब्बू वीर सतनामसिंग अटवाल आणि नवज्योत सिंह लाडी अजितसिंग धुम्मन (३५) रा. जरीपटका अशी आरोपीची नावे आहेत.दरयानी बंधूचा फरसाण आणि बिस्कीटाचा व्यवसाय आहे. पोलीस सूत्रानुसार दरयानी बंधू भिसीसुद्धा चालवतात. अशोक चौक येथील रहिवासी ईश्वर कुंगवानी हे सुद्धा त्यांच्या भिसीशी तीन वर्षांपूर्वी जुळले होते. कुंगवानी यांचा नंबर लागला. त्यांनी भिसीचे १.२० लाख रुपये घेतले. त्यांना दर महिन्याला १० हजार रुपयाचा भिसीचा हप्ता भरायचा होता. कुंगवानी यांनी नऊ महिने नियमित हप्ते भरले. तीन हप्ते म्हणजेच ३० हजार रुपये ते भरू शकले नाही. यामुळे दरयानी बंधू नाराज होते. ते कुंगवानी यांना भिसीचे पैसे देण्याबाबत दबाव टाकत होेते. यामुळे त्यांच्यात वादही सुरु होता.१३ मे रोजी २.३० वाजता दरयानी बंधू हे बब्बू वीर आणि नवजोत सिंह यांच्यासह कुंगवानी यांच्या घरी गेले. तिथे त्यांना बळजबरीने बाईकवर बसवून पाटणकर चौकात आणले. तिथे एका टिनाच्या शेडमध्ये त्यांना बंधक बनवून पैशाची मागणी केली. पैसे न दिल्याने मारहाण केली. आरोपी कुंगवानीसोबत त्यांची मोटार सायकल सुद्धा घेऊन आले होते. कुंगवानी यांना बंधक बनवल्यानंतर आरोपी त्यांची बाईक घेऊन फरार झाले.कुंगवानी यांनी कशीबशी स्वत:ची सुटका केली. सुरक्षा भिंत ओलांडून ते पळाले. ते खूप घाबरले होते. म्हणून पोलिसांकडेही गेले नाहीत. सोमवारी सकाळी पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अपहरण, मारहाण आणि खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.लोकमतचे वृत्त खरे ठरलेलोकमतने बॉबी माकन हत्याकांडादरम्यान उत्तर नागपुरात सर्रासपणे भिसीचा धंदा चालत असल्याचे वृत्त दिले होते. या धंद्यातील मोठा मासा असलेला मंजित वाडे हा सुद्धा बॉबीच्या हत्याकांडात सहभागी आहे. परंतु तो अजूनही फरार आहे. हत्येचा सूत्रधार लिटील सरदारसह उत्तर नागपुरातील अनेक गुन्हेगार भिसीच्या धंद्यात मालामाल झाले आहेत.

 

टॅग्स :KidnappingअपहरणArrestअटक