शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नागपुरात अपहरण करून तरुणीवर ऑटोचालकाचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 20:16 IST

रागाच्या भरात घरून बाहेर पडलेल्या तरुणीचे (वय २९) अपहरण करून तिला मित्राच्या खोलीवर नेऊन डांबून ठेवत एका ऑटोचालकाने तिच्यावर रात्रभर बलात्कार केला. तो सकाळी निघून गेल्यानंतर त्याच्या मित्रानेही तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देमित्राच्या खोलीवर डांबून ठेवले : मित्रानेही केला बलात्काराचा प्रयत्नधंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रागाच्या भरात घरून बाहेर पडलेल्या तरुणीचे (वय २९) अपहरण करून तिला मित्राच्या खोलीवर नेऊन डांबून ठेवत एका ऑटोचालकाने तिच्यावर रात्रभर बलात्कार केला. तो सकाळी निघून गेल्यानंतर त्याच्या मित्रानेही तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. राग शांत झाल्यानंतर घरी परतलेल्या तरुणीने आपल्या पालकांना आपबिती सांगितली. त्यानंतर धंतोली पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपी ऑटोचालकांना अटक केली. शहजाद शेख शब्बीर शेख (वय २६, रा. मारवाडी चौक, इतवारी) आणि मोहम्मद जावेद अन्सारी (वय २४) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.पीडित तरुणी छत्रपती चौकाजवळ राहते. तिच्या परिवाराची स्थिती बेताची आहे. मध्ये मध्ये तिला वेडसरपणाचे झटके येतात. त्यामुळे पतीने तिला सोडून दिले. तिला सहा वर्षांची मुलगी असून, या मुलीसह पीडित तरुणी आपल्या आईवडिलांकडे राहते. मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास घरच्यांनी रागावले म्हणून ती रागाच्या भरात घराबाहेर पडली. नरेंद्रनगर पुलाकडे जात असताना आरोपी शहजाद त्याच रस्त्याने ऑटो घेऊन जात होता. त्याने ऑटो थांबवून तिला आपल्या ऑटोत बसवले अन् सरळ तिला उप्पलवाडीतील मित्राच्या (आरोपी जावेदच्या) घरी नेले. जावेद विवाहित आहे. त्याची पत्नी आणि मुले यावेळी घरीच होते. ही आपली पत्नी आहे. घरच्यांसोबत आपला वाद झाला असे सांगून आरोपी शहजादने जावेदच्या घरी मुक्काम ठोकला. यावेळी त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून रात्रभर पीडित तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तो बुधवारी सकाळी तिला तेथेच ठेवून ऑटो घेऊन निघून गेला. दुपारी घरी कुणी नसल्याची संधी साधून जावेदनेही तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, तिने विरोध केल्याने तो गप्प बसला. त्यानंतर रात्री पुन्हा शहजाद आला. त्याने तिला सोबत इतवारी रेल्वेस्थानकावर नेले. तेथे रात्रभर त्यांनी मुक्काम केला. गुरुवारी सकाळी तिला सक्करदऱ्यात एका ठिकाणी सोडून निघून गेला. पीडित तरुणीने तेथून सरळ आपले घर गाठले. दरम्यान, दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्यामुळे अस्वस्थ असलेल्या पालकांनी ती घरी परतताच तिला विचारणा केली.तिने आपबिती सांगताच पालकांनी तिला धंतोली ठाण्यात नेले. ठाणेदार विजय आकोत यांनी तक्रार ऐकून आरोपी शहजादविरुद्ध अपहरण करून बलात्कार करणे, डांबून ठेवणे, धमक्या देणे तसेच आरोपी जावेदविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आपल्या सहकाऱ्यांना लगेच शोधकामी लावून दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना आज कोर्टात हजर करून त्यांचा २५ ऑगस्टपर्यंत पीसीआर मिळवला.मोबाईलने फसला आरोपीआरोपी शहजादने दोन दिवस (दोन रात्र) तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर गुरुवारी तिला सोडून जाताना त्याने पुन्हा कधी वाटले तर मला फोन कर, असे म्हणत तिला स्वत:चा मोबाईल नंबरही दिला. तरुणीकडून पोलिसांनी तो नंबर घेऊन आरोपी शहजादला गुरुवारी रात्री नंदनवनमध्ये बोलवून घेतले. तरुणीने पुन्हा फोन केल्याचे पाहून आरोपी शहजाद लगबगीने तेथे पोहचला. तरुणीजवळ येताच धंतोली पोलिसांनी त्याची गचांडी धरली.ऑटोचालकाची गुंडगिरी ठेचणार कोणउपराजधानीतील काही (सर्व नव्हे) ऑटोचालकांची गुंडगिरी वाढतच चालली आहे. एकट्या महिला-मुलीची छेड काढणे, त्यांचे अपहरण करणे, बलात्कार करणे, असे गुन्हे यावेळीही नागपुरात घडले आहे. महिला मुलींसोबतच काही आरोपी ऑटोचालक मनमाने पैसे मागण्यासाठी सभ्य तसेच प्रतिष्ठित व्यक्तींसोबत वाद घालून त्यांना वेठीस धरतात. त्यांनी विरोध केल्यास अपमान करतात. शुक्रवारी दुपारी छत्रपती चौकात अशाच प्रकारे एका ऑटोचालकाने मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी ऑटोत कोंबले. त्यामुळे एका व्यक्तीने त्याच्या ऑटोत बसण्यास नकार दिल्यामुळे आरोपी ऑटोचालकाने त्यांच्यासोबत वाद घातला. बाजूला उभे असलेल्या एका पत्रकाराने त्याची माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांना कळविली. भांडारकर यांनी तत्परतेने आपल्या सहकाऱ्यांच्या माहिती देऊन त्या ऑटोचालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणRapeबलात्कार