शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तरुणाला मारहाण करून केले अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:07 IST

प्रेम प्रकरणात निर्माण झालेल्या त्रिकोणातून एका तरुणाचे अपहरण करून सशस्त्र आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. वेळीच पोलिसांना माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपींची शोधाशोध केली. ते कळाल्याने आरोपींनी त्या तरुणाला मारहाण करून सोडून दिले.

ठळक मुद्देप्रेम प्रकरणात त्रिकोण : सशस्त्र आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेम प्रकरणात निर्माण झालेल्या त्रिकोणातून एका तरुणाचे अपहरण करून सशस्त्र आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. वेळीच पोलिसांना माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपींची शोधाशोध केली. ते कळाल्याने आरोपींनी त्या तरुणाला मारहाण करून सोडून दिले. फुटाळ्याच्या चौपाटीवर शुक्रवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली.अ‍ॅन्डी ऊर्फ कुलदीपसिंग उत्तमसिंग (वय २४) असे या प्रकरणातील अपहृत तरुणाचे नाव आहे. तो हजारीपहाड भागात राहतो. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रेमत्रिकोणात सहभागी असलेल्या अ‍ॅन्डीने आरोपी आकाश ऊर्फ आशूच्या नावाने शिवीगाळ केली. ते कळाल्याने आरोपी आशिष ऊर्फ आशू कुत्तरमारे (वय २८, रा. रामदासपेठ), सानू कन्हैयालाल मंडपे (वय २६, रा. रामदासपेठ, सीताबर्डी) आणि त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराने शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास अ‍ॅन्डीला फुटाळा तलावाच्या चौपाटीवर पकडले. त्याला चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण केली. आशूची बदनामी केल्यास जीवे ठार मारू, अशी धमकी देऊन त्याला आपल्या स्वीफ्ट कारमध्ये कोंबले. त्याचे अपहरण करून आरोपींनी त्याला पळवून नेल्याची माहिती कळताच अंबाझरी तसेच गुन्हे शाखेचा पोलीस ताफा शोधाशोध करू लागला. गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच अंबाझरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून आरोपी आशू कुत्तरमारे, सानू मंडपे आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. अ‍ॅन्डीच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध अपहरण तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Kidnappingअपहरणnagpurनागपूर