शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मजुरी मागितली म्हणून अपहरण करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:06 IST

ईद साजरी करण्यासाठी आपल्या गावाला जातो, असे सांगून मजुरीचे पैसे मागितले म्हणून तीन तरुणांचे सहा आरोपींनी अपहरण केले. त्यांना गोदामात डांबून बेदम मारहाण केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली.

ठळक मुद्देगोदामात डांबले : नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ईद साजरी करण्यासाठी आपल्या गावाला जातो, असे सांगून मजुरीचे पैसे मागितले म्हणून तीन तरुणांचे सहा आरोपींनी अपहरण केले. त्यांना गोदामात डांबून बेदम मारहाण केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात कृष्णा रमाशंकर गुप्ता नामक तरुणाच्या तक्रारीवरून आशिष शाहू, छोटू शाहू, सदन, दीपेंद्र शाहू, विनीत शाहू आणि अविश नामक आरोपींविरुद्ध अपहरण करून मारहाण करणे, धमकी देणे आदी आरोपांखाली गुन्हा दाखल केला.कृष्णा गुप्ता, आमिन राईन, अजमेर राईन, मोहम्मद आरिफ (आणि आणखी काही) अशी पीडितांची नावे आहेत. ते उत्तर प्रदेशातील जंघईजवळचे रहिवासी आहेत. आरोपींकडे ते हातठेल्यावर काम करतात.रमजान ईद साजरी करण्यासाठी ते आपल्या गावाला जाण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी आपल्या कामाचे पैसे आरोपींकडे मागितले. कृष्णाचेही १२,५०० रुपये होते. मित्र गावाला चालले, त्यांच्या हाती आपल्या कुटुंबीयांना पैसे पाठविण्याचा त्याचा मानस होता. त्यामुळे कृष्णा आणि त्याच्या उपरोक्त मित्रांनी सोमवारी आरोपी शाहूंना पैसे मागितले. ते काम सोडून जातील, अशी शंका आल्याने आरोपींनी त्यांच्याकडून दिवसभर काम करून घेतल्यानंतर त्यांना घरी जाण्यास सांगितले. ते आपल्या रूमवर गेल्यानंतर उपरोक्त आरोपींनी कृष्णा, आरिफ आणि अजमेर राईन या तिघांना सोमवारी मध्यरात्री एका ऑटोत जबरदस्तीने बसविले. त्यांना मेकोसाबागमधील आशिष शाहूच्या गोदामात नेले. तेथे हातठेल्यावरील पैसे चोरल्याचा आळ घेऊन त्यांना बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, आरोपींनी तेथे त्यांच्यापूर्वी कृष्णाचा भाऊ तसेच मित्राला आधीच हात बांधून डांबून ठेवले होते. त्यांना शटर उघडून बाहेर काढले आणि त्यांनाही बेदम मारहाण केली.सामाजिक कार्यकर्त्यांचा दिलासागंभीर मारहाणीत जखमी झाल्यामुळे हे सर्व तरुण दहशतीत आले. त्यांची ती अवस्था बघून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना दिलासा देऊन जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कृष्णा आणि राईन ठाण्यात पोहचले. त्यांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध अपहरण करून मारहाण करणे, डांबून ठेवणे, धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक झाली की नाही, ते जरीपटका पोलिसांकडून स्पष्ट झाले नव्हते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण