शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणीची मागणी, ‘लिटील सरदार’सह दोघांना अटक

By योगेश पांडे | Updated: August 8, 2023 17:28 IST

तुझा प्लॉट आमच्या नावावर कर, नाहीतर तुला ठार मारू म्हणत धमकावले

नागपूर : कपड्याच्या व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यात कुख्यात लिटील सरदार उर्फ शैलेंद्रसिंह लोहिया (४७, श्रीवास अपार्टमेंट, अशोक चौक, पाचपावली) व सिद्धू हरजितसिंह गुरुचरणसिंह कौर (३४, एनआयटी मैदान, बिनाकी मंगळवारी) यांचा समावेश आहे. जरीपटका पोलीस ठाण्यातील पथकाने त्यांना अटक केली.

मनिंदरसिंह हरविंदरसिंह चंडोक (३९) हे कपड्याचे व्यापारी आहेत. २ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता लिटील सरदार व सिद्धू हरजितसिंह हे त्यांच्या दुकानात गेले व त्यांनी चंडोक यांना जबरदस्तीने उचलून लिटील सरदारच्या अशोक चौक येथील कार्यालयात आणले. तुझ्यामुळे हत्येच्या प्रकरणात आम्ही फसलो असून सुनावणीच्या पुढील तारखेला आम्हाला सात लाख रुपये दे. जर पैसे नसतील तर तुझा प्लॉट आमच्या नावावर कर, नाहीतर तुला ठार मारू, या शब्दांत त्यांनी चंडोक यांना धमकी दिली. चंडोक यांनी त्यानंतर जरीपटका पोलीस ठाणे गाठून दोन्ही आरोपींविरोधात तक्रार केली. पोलिसांनी लिटील सरदार व सिद्धू हरजितसिंहविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरArrestअटक