शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

मार्च २०१९ पासून धावणार खापरी ते बर्डी मेट्रो ट्रेन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:09 IST

खापरी ते साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंतच्या एटग्रेड (जमीन) सेक्शनचे काम पूर्ण झाले असून कमिश्नर आॅफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांनी जॉय राईडसाठी हिरवी झेंडी दिली आहे. आता नागपूरकरांचे लक्ष शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या इतर कामांवर केंद्रीत झाले आहे. याबाबत महामेट्रोचे प्रबंध निदेशक डॉ. बृजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्र परिषद सांगितले की एटग्रेड सेक्शननंतर व्हाया काँग्रेसनगर सीताबर्डीपर्यंतचे मेट्रोचे काम मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होऊन खापरी ते बर्डी अशी मेट्रो धावायला लागेल.

ठळक मुद्देजॉय राईड लवकरच : एटग्रेड सेक्शनमध्ये सीएमआरएसने दिली हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खापरी ते साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपर्यंतच्या एटग्रेड (जमीन) सेक्शनचे काम पूर्ण झाले असून कमिश्नर आॅफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) यांनी जॉय राईडसाठी हिरवी झेंडी दिली आहे. आता नागपूरकरांचे लक्ष शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या इतर कामांवर केंद्रीत झाले आहे. याबाबत महामेट्रोचे प्रबंध निदेशक डॉ. बृजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्र परिषद सांगितले की एटग्रेड सेक्शननंतर व्हाया काँग्रेसनगर सीताबर्डीपर्यंतचे मेट्रोचे काम मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होऊन खापरी ते बर्डी अशी मेट्रो धावायला लागेल. ते पुढे म्हणाले, लोकमान्यनगर ते सुभाषनगरपर्यंतचे पाच मेट्रो स्टेशन, व्हाया डक्ट, ट्रॅक व अन्य संबंधित कामे डिसेंबर २०१८ पर्यंत आणि सुभाषनगर ते मुंजे चौकपर्यंतचे काम जून २०१९ पर्यंत पूर्ण केले जाईल. बर्डी ते आॅटोमोटिव्ह चौक आणि बर्डी ते प्रजापतिनगरपर्यंतचे मेट्रो वर्क पूर्ण होण्याची तारीख सध्या सांगता येणार नाही. परंतु कुठल्याही परिस्थितीत २०१९ पर्यंत मेट्रो प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केले जाईल. वर्धा रोडवरील डबल डेकर ब्रिज डिसेंबर २०१८ पर्यंत तयार होईल. एटग्रेड सेक्शनमध्ये १६ एप्रिलला परीक्षण दौरा करून सीएमआरएस यांनी महामेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. या सेक्शनमध्ये खापरी, न्यू एअरपोर्ट आणि एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशनदरम्यान निमंत्रण आणि विनंतीच्या आधारे लवकरच जॉय राईड सुरू केली जाईल. सर्वात आधी २३ एप्रिलला हँडीकॅप्ड होम, अनाथालय आणि वृद्धाश्रमातील मंडळींना नि:शुल्क प्री-जॉय राईडचा आनंद लुटता येईल.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर