शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

वैरभाव नष्ट करून मित्रभाव वृद्धिंगत करतो ‘खमत खामणा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 20:43 IST

दिवसभर आपल्या हातून अनवधानाने होणाऱ्या पापाचरणाचा पश्चात्ताप, खेद व्यक्त करण्यासाठी आणि आपल्यामुळे दुसऱ्याला होणाऱ्या दु:ख, हिंसाचारासाठी किंवा प्रत्येक चुकीसाठी ‘मिच्छामि दुक्कडम्’ म्हटले जाते. यात कुठेच क्षमा मागितली जात नाही किंवा क्षमा केलीही जात नाही.

ठळक मुद्देपश्चात्तापासाठी बोलले जाते ‘मिच्छामि दुक्कड़म्’

स्वप्निल जैन : लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्वराज पर्युषण पर्वाच्या तात्काळ नंतर साजरा होणाऱ्या क्षमावाणी महापर्वात वैरभाव सोडून एकमेकांना क्षमायाचना केली जाते आणि एकमेकांप्रति क्षमाभाव व्यक्त केला जातो. मनोमालिन्य दूर करण्याचा हा क्षमापना पर्व वर्तमानात केवळ शिष्टाचारापुरता उरलेला आहे. शिष्टाचार आणि परंपरेनुसार प्रत्येक जण एकमेकांना ‘मिच्छामि दुक्कडम्’ बोलून किंवा मोबाईल संदेशाद्वारे मोकळे होत आहेत. वास्तवात वर्तमान पिढी ‘मिच्छामि दुक्कडम्’च्या खऱ्या अर्थापासून अनभिज्ञ आहे.

‘मिच्छामि दुक्कडम्’चा अर्थ ‘माझे पाप निष्फळ ठरोत, खोटे ठरोत’ असा होतो. या शब्दांमध्ये क्षमाभाव कुठेच उल्लेखित होत नाही. परंतु, अनुकरणाच्या आहारी जाऊन अज्ञानतेमुळे या अनुपयुक्त शब्दांचा सर्रास उपयोग केला जातो. इतक्या वर्षापासून पर्युषण पर्वाच्या अखेरच्या दिवशी क्षमापनेच्या वेळी ‘मिच्छामि दुक्कडम्’ हेच शब्द उपयोगात आणून क्षमा मागितली जात आहे आणि यावर आजवर कुणीच आक्षेपही घेतला नाही. मग, अचानक आजच हा शब्द चुकीचा कसा, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तात्पर्य हाच की हा शब्द चुकीचा नाहीच. केवळ क्षमायाचना महापर्वासाठी हा शब्द उपयुक्त नाही, हेच सांगणे आहे. एकमेकांची क्षमा मागताना ‘मिच्छामि दुक्कडम्’ ऐवजी ‘खमत खामणा’ हे शब्द अत्यंत उपयुक्त आहे. या शब्दाचा सामान्य अर्थ ‘आपली क्षमा मागतो आणि तुम्हाला क्षमा करतो’ असा होतो. त्यामुळे, क्षमापनेच्या दिवशी एकमेकांना ‘खमत खामणा’ म्हणणेच उत्तम ठरेल.इथे होतो प्रयोग‘मिच्छामि दुक्कडम्’चा उपयोग दररोज प्रतिक्रमण करताना केला जातो. दिवसभर आपल्या हातून अनवधानाने होणाऱ्या पापाचरणाचा पश्चात्ताप, खेद व्यक्त करण्यासाठी आणि आपल्यामुळे दुसऱ्याला होणाऱ्या दु:ख, हिंसाचारासाठी किंवा प्रत्येक चुकीसाठी ‘मिच्छामि दुक्कडम्’ म्हटले जाते. यात कुठेच क्षमा मागितली जात नाही किंवा क्षमा केलीही जात नाही. मात्र, आपले पाप निष्फळ करण्याची विनवणी आणि पश्चात्ताप भाव व्यक्त होतो.

‘खमत खामणा’चा अर्थ क्षमा मागणे व क्षमा करणे असा होतो. वैरभाव नष्ट करणे आणि मैत्रीभाव वाढविण्यासाठी याचा उपयोग केला जातो. या शब्दात दोन्ही क्रिया एकसाथ होतात. या शब्दात सहज मनाने आपल्या ज्ञात, अज्ञात चुकांना, दुष्प्रवृत्ती व दुष्कृत्यांसाठी क्षमायाचना आहे. जर कुणाच्या कठोर शब्दांनी आपले मन दुखावले असेल तर त्याला सहज क्षमा करण्याचा भावही आहे. ‘मिच्छामि दुक्कडम्’ कर्मांच्या नाशासाठी म्हटले जाते आणि ‘खमत खामणा’ प्रतिक्रमणाच्या अखेर सोबती साधक, श्रावकांविषयी झालेल्या चूकभूलसाठी क्षमा करण्यास व्यक्त करण्यासाठी म्हटले जाते. एकूणच ज्या जिनआमनायांच्या नुसार ‘मिच्छामि दुक्कडम्’चा उपयोग प्रतिक्रमणावेळी आणि ‘खमत खामणा’चा उपयोग प्रतिक्रमणानंतर केला जातो.हे दोन्ही शब्द जिनाम्नाय चे‘मिच्छामि दुक्कडम्’ आणि ‘खमत खामणा’ हे दोन्ही शब्द एकदम उपयुक्त असून, जिन आमनायमध्ये उल्लेखित आहेत. दोन्ही शब्दांचे भाव आणि अर्थ अत्यंत वेगळे आहेत. या दोन्ही शब्दांचे समान अर्थ सांगणारे किंवा पर्याय म्हणून वापरले जाणारे शब्द म्हणने चुकीचे आणि आगमच्या विरूद्ध ठरेल. प्रसंगानुरूप योग्य शब्दांचाच उपयोग करणे व्यवहारप्रद असल्याचे नेहमीच सांगितले जाते.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिक