शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन मिनिटांच्या वेळेसाठी खडसेंचा संताप; थेट आकस अन् दुश्मनीचाच आरोप

By योगेश पांडे | Updated: December 18, 2024 18:29 IST

Nagpur : तालिका सभापतींशी जुंपली

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषद सभागृहात कामकाज सुरू असताना आपली भूमिका जास्तीत जास्त वेळ मांडण्याचा अनेक सदस्यांचा प्रयत्न असतो. यात त्यांना दिलेल्या वेळेचे भानदेखील राहत नाही आणि कुणी आठवण करून दिली तर तीळपापड होतो. असाच प्रकार बुधवारी विधान परिषदेत झाला. विधान परिषदेत तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी वेळेची आठवण करून दिल्याने राष्ट्रवादीचे सदस्य एकनाथ खडसे बुधवारी चांगलेच संतापल्याचे दिसून आले. दोन मिनिटे अगोदर मला का थांबविले, असा सवाल उपस्थित करत खडसे यांनी डावखरे यांच्यावर आकस आणि दुश्मनीचाच आरोप लावला. यामुळे सभागृहातील सदस्यदेखील अचंबित झाले.

राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना खडसे ११.२७ मिनिटांनी बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी अभिभाषणात आदिवासी व अनुसूचित जातींच्या मुद्द्यांचा समावेश नसल्याबाबत खंत व्यक्त केली. तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी खडसे यांना दहा मिनिटेच बोलण्याची मुभा दिली होती. याची ११.३७ मिनिटांनी डावखरे यांनी बेल वाजवून आठवण करून दिली. यावरून खडसे यांचा पारा चढला. तुम्ही खुर्चीवर असताना मला कधीही वेळ देत नाही, असे म्हणून त्यांनी संताप व्यक्त केला. तुमचा माझ्यावर इतका आकस का आहे व माझ्याशी तुमची काय दुश्मनी आहे तसेच मला दोन मिनिटे अगोदर का थांबविले, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. खडसेंच्या या वक्तव्यानंतर मंत्री शंभूराज देसाई हे लगेच उभे झाले व सभापती किंवा तालिका सभापतींबाबत आकसाची भाषा करणे अयोग्य असल्याचे म्हटले. तुम्हाला अगोदरच वेळेची कल्पना दिली होती. खुर्चीवर वैयक्तिक टीका करणे चुकीचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली. डावखरे यांनीदेखील खडसे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर सेनेचे अनिल परब यांनी आक्षेप घेतला. कुणी किती वेळ बोलायचे हे कोण ठरविणार व त्याला कुठल्या नियमाचा आधार आहे, असा सवाल त्यांनी केला. अखेर डावखरे यांनी त्यांना सभापतिपदाच्या खुर्चीवर असलेल्यांना नियम क्रमांक ६२ अंतर्गत हे ठरविता येते असे उत्तर दिले. मात्र विरोधकांचा गोंधळ सुरूच होता.

आदिवासींनी राज्यात जन्म घेऊन पाप केले का?राज्य सरकार आदिवासी व अनुसूचित जातींच्या विरोधात असल्याची टीका त्यांनी केली. नंदुरबारप्रमाणे कोल्हापूर, जळगाव, ठाणे जिल्ह्यांतदेखील कुपोषण वाढत असून, राज्यासाठी ही बाब लांच्छनास्पद आहे. याची सरकारने चौकशी केली पाहिजे व विशेष मोहीम राबविली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. आदिवासींकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहेत. ते कीड्यामुंग्यांसारखे आयुष्य जगत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात जन्म घेऊन पाप केले का, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVidhan Parishadविधान परिषदnagpurनागपूर