शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात केजरीवालांना मिळाले प्रशासकीय ‘संस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 10:35 IST

शांत व विवेकी स्वभाव, तसेच ‘साधी राहणी’ असलेल्या केजरीवाल यांनी १९ वर्षांपूर्वी नागपुरातील ‘एनएडीटी’ येथे प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण घेतले होते.

ठळक मुद्दे‘एनएडीटी’त मिळविली प्रशासकीय हातोटीदहा वर्षांपूर्वी नागपुरात व्याख्यानआयुष्याला मिळाली दिशा

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीच्या विधानसभा निवडणुकात अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ने परत एकदा दणदणीत विजय मिळवून ‘टीमस्पिरिट’चा आदर्शच जगासमोर ठेवला आहे. केजरीवाल यांच्या या यशाचे सर्वात मोठे श्रेय त्यांची प्रशासकीय हातोटी, मागील पाच वर्षांत विविध विकासात्मक कामांसाठी घेतलेला पुढाकार व योजनांच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या पुढाकाराला जात आहे. केजरीवालांमधील हे गुण घडविण्यात नागपूरचा मोठा वाटा राहिलेला आहे. शांत व विवेकी स्वभाव, तसेच ‘साधी राहणी’ असलेल्या केजरीवाल यांनी १९ वर्षांपूर्वी नागपुरातील ‘एनएडीटी’ येथे प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण घेतले होते. येथे मिळालेल्या प्रशासकीय संस्कारांवर चालत ते ‘आयकॉन’ झाले, हे विशेष.केजरीवाल हे राजकारणी असले तरी त्यांचा मूळ पिंड हा प्रशासकीय अधिकाऱ्याचा आहे. त्यांच्यातील व्यक्तिमत्त्व घडविण्यात नागपूरचा मौलिक वाटा राहिला. भारतीय महसूल सेवा परीक्षा उत्तीर्ण केल्यावर केजरीवाल १९९४-९५ या दरम्यान प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणासाठी नागपुरातील छिंदवाडा मार्गावरील प्रत्यक्ष कर अकादमी येथे आले होते. यावेळी त्यांचा मुक्काम अकादमीतीलच ‘नालंदा’ वसतिगृहाच्या खोली क्र. १६ मध्ये होता. या खोलीमध्ये केजरीवाल यांनी देशाची अर्थव्यवस्था, करव्यवस्था अन् समाजाशी जुळलेल्या विविध मुद्यांबाबत सखोल अभ्यास केला. एखादी गोष्ट करायची म्हणजे ती करायचीच, ही त्यांची जिद्द असायची. एखादा मुद्दा सखोल जाणून घ्यायचा असेल तर ते तहानभूक हरवून वाचत बसत. तब्बल दीड वर्षे येथे राहून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. ते ४७ व्या बॅचचे प्रशिक्षणार्थी होते. याच कालावधीत देशातील राजकारणाची स्थिती, समाजकारणाची दिशा यावरदेखील त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा होत व त्यातून त्यांचे विचार घडत गेले.

समाजकारणाचे रोवले गेले बीजकेजरीवाल यांच्या साध्या राहणीचे नागरिकांमध्ये आकर्षण आहे. त्यांच्यातील समाजसेवकाच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवातदेखील नागपुरातच झाली. प्रशिक्षणार्थी सहकाºयांचे जुने वापरलेले कपडे ते गोळा करायचे. अनेकांना याचे आश्चर्य वाटायचे. हे कपडे ते काटोल मार्गावरील मदर टेरेसा आश्रमाला द्यायचे. शिवाय अकादमीमध्ये रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.

नागपुरातच भेटल्या ‘मिसेस मुख्यमंत्री’केजरीवाल यांच्या प्रशासकीय अधिकारी तसेच राजकारणी म्हणून प्रवासात त्यांच्या पत्नी सुनिता या नेहमीच त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. केजरीवाल राजकारणात गेल्यानंतर त्यांनी ‘आयआरएस’ सेवेतून स्वेच्छानिवृत्तीदेखील घेतली. सुनिता नावाची ही सावली केजरीवाल यांना नागपुरातच गवसली. प्रशिक्षण काळात ‘एनएडीटी’मध्ये प्रशिक्षणार्थी असलेल्या सुनिता यांच्याशी अरविंद केजरीवाल यांची मैत्री जुळली. दोघांचेही विचार जुळत होते. प्रशिक्षण सुरू असताना मनांची आपसूकच गुंफण झाली. केजरीवाल यांनी सुनिता यांना साधेपणाने ‘प्रपोज’ केले व त्यांना लगेच होकारदेखील मिळाला. नंतर त्या सौ. सुनिता केजरीवाल झाल्या. विशेष म्हणजे मी गोविंदाचा ‘फॅन’ होतो व आम्ही दोघांनी नागपुरातील अनेक चित्रपट पाहिले, असे खुद्द केजरीवाल यांनीच सांगितले होते. अशाप्रकारे केजरीवाल यांचे नागपूरशी एक आगळेवेगळे नाते आहे.केजरीवाल १९९४-९५ मध्ये येथील प्रशिक्षण पूर्ण करून परत गेले. मात्र त्यांच्या मनात अकादमीविषयी निर्माण झालेले प्रेम त्यांना गत १० वर्षांपूर्वी पुन्हा येथे खेचून आणले. अरविंद केजरीवाल अकादमीमधील नवीन प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नागपुरात आले होते. यावेळी अकादमीमधील वैशाली गेस्ट हाऊसमध्ये काही दिवस मुक्काम केला होता. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल