शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
2
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
3
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
4
कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
5
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
6
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
7
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
8
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
9
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
10
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
11
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
12
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
13
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
14
'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
15
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!
16
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
17
IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...
18
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
19
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
20
मल्टीबॅगर शेअर, 75 देशांमध्ये Tejas चा व्यवसाय; आता मिळाली ₹1526 कोटींची ऑर्डर

जनतेसोबत नाळ जोडून ठेवा :  भाजप आमदारांना संघाचे बौद्धिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:40 IST

हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी बुधवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागस्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली.

ठळक मुद्दे‘इनकमिंग’ आमदार प्रथमच संघस्थानी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी बुधवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागस्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. विशेषत: यात नव्यानेच पक्षात आलेल्यांचादेखील समावेश होता. राज्यातील सत्ता गेल्यानंतर प्रथमच आमदार संघस्थानी येत असल्याने संघातर्फे काय मार्गदर्शन करण्यात येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु या सर्वांना संघाच्या कार्यपद्धतीची ओळख करून देण्यावरच भर राहिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघातर्फे जास्त ‘बौद्धिक’ टाळण्यात आले असले तरी जनतेसोबत नाळ जोडून ठेवा, असे सांगत हवा तो संदेश देण्यात आला आहे.सकाळच्या सुमारास विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात सर्व आमदार रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. यात ‘इनकमिंग’ केलेले राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, नीतेश राणे यांचादेखील समावेश होता, शिवाय प्रदेश संघटनमंत्री व्ही. सतीश हेदेखील उपस्थित होते. सर्व मंत्री व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर मार्गदर्शन वर्गाला सुरुवात झाली.संघातर्फे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे हे उपस्थित होते. संघ विचारधारा, कार्यप्रणाली, चालणारे उपक्रम यांची माहिती देण्यात आली. जिल्हाजिल्ह्यात आमदारांनी जनतेसोबत समन्वय जास्तीत जास्त कसा वाढेल यादृष्टीने कार्य केले पाहिजे, असा सल्ला यावेळी देण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या डोळ्यासमोर ठेवूनच काम करावे, असेदेखील श्रीधर गाडगे यांनी सांगितले.राणेंचा ‘दक्ष’ पवित्राएरवी नीतेश राणे प्रसारमाध्यमांना सहजपणे प्रतिक्रिया देतात. मात्र संघभूमीत त्यांनी ‘दक्ष’ पवित्रा घेतला. येथे बोलणे योग्य होणार नाही व ती येथील परंपरा नाही, असे म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.केवळ संघाची ओळख करून देण्यासाठी वर्गराधाकृष्ण विखे पाटील यांना विचारणा केली असता, हा वर्ग केवळ नवनिर्वाचित भाजपा आमदारांना संघाची ओळख करून देण्यासाठी होता, असे त्यांनी स्पष्ट केले. संघाच्या या वर्गाची उत्सुकता होती, असेदेखील ते म्हणाले. संघ विचारसरणीशी मी आधी परिचित होतो. स्मृतिमंदिर परिसरात प्रत्यक्ष संघस्थानी आल्यावर समाधान वाटतंय, महान नेत्यांच्या आठवणी इथे आहेत, अशी भावना आ. गणेश नाईक यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ