शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

ऑनलाईन क्लासेस व परीक्षांमुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवा: असीमकुमार गुप्ता यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:47 IST

Asimkumar Gupta, Power supply, Nagpur Newsराज्यभरात सध्या शाळा व महाविद्यालयांचे वर्ग व परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरू आहेत. सोबतच प्रामुख्याने आयटी व इतर क्षेत्रातदेखील ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करावी.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरात सध्या शाळा व महाविद्यालयांचे वर्ग व परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरू आहेत. सोबतच प्रामुख्याने आयटी व इतर क्षेत्रातदेखील ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी उपाययोजना करावी. अत्यावश्यक कामे असल्याखेरीज वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभालीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी दिले आहेत.राज्यात येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत शैक्षणिक वर्ग बंद राहणार आहेत. त्यामुळे शालेय वर्ग व परीक्षा तसेच इतर महत्त्वाच्या परीक्षा ऑनलाईनद्वारे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणकडून अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्यात यावी. तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून प्राधान्याने वीजपुरवठा करण्यात यावा. अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये. देखभाल व दुरुस्तीचे काम अत्यंत आवश्यक असल्यास ऑनलाईन शैक्षणिक वर्ग व परीक्षांचा कालावधी टाळून कामे करण्यात यावे. तत्पूर्वी महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित शैक्षणिक संस्थांशी समन्वय व संवाद साधून पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे नियोजन करावे व त्यासंबंधीची माहिती ‘एसएमएस’द्वारे संबंधित वीजग्राहकांना देण्यात यावी, असेही निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

टॅग्स :electricityवीजonlineऑनलाइन