शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

महावितरण अधिकारी सापडले कात्रीत

By admin | Updated: June 17, 2014 00:43 IST

जिल्हा विद्युतीकरण समन्वय बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत विद्युत महावितरण अधिकारी खासदार व आमदारांच्या कात्रीत सापडले होते. भारनियमनविषयी

समन्वय बैठकीत केवळ चर्चा : भारनियमनाचा मुद्दा गाजलाअमरावती : जिल्हा विद्युतीकरण समन्वय बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत विद्युत महावितरण अधिकारी खासदार व आमदारांच्या कात्रीत सापडले होते. भारनियमनविषयी तसेच विद्युत महावितरणाबद्दलच्या अनेक तक्रारींबाबत बैठकीत घमासान चर्चा झाल्याने महावितरण अधिकाऱ्यांना बोलणे सुचेनासे झाले होते. खासदार आंनदराव अडसूळ यांच्या अध्यतेखाली झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार, माजी खासदार अंनत गुढे, विद्युत महावितरणाचे अधीक्षक अभिंयता दिलीप घुगल, इंडिया बुल्सचे व्यवस्थापक अमित पंचालवार, आमदार वीरेन्द्र जगताप, आमदार प्रवीण पोटे, आमदार केवलराम काळे, आमदार यशोमती ठाकूर, आमदार अभिजित अडसूळ, एमआयडीसी असोसिएयनचे अध्यक्ष राजेन्द्र भागलीया, विद्युत विभागाचे प्रमोद दहाट, व्ही.डी. मेंढे, किरण पातूरकर यांच्यासह आदी उपस्थित होते. या बैठकीत विविध मुद्दे असताना कोणत्या मुद्यावर आधी चर्चा करायची हाच प्रश्न पडला होता. चर्चेतील पहिला मुद्दा खासदारांनी वाचुन दाखविला. यामध्ये ग्राहकांच्या प्रत्येक वर्गवारीमध्ये दरवर्षी होणाऱ्या वाढीच्या प्रमाणात विद्युत वितरण व्यवस्थेतील पायाभूत सुविधा वाढ सुसंगत आहे काय, याबाबत माहिती देण्याचे मुद्दा ठेवण्यात आला. मात्र आपल्या जिल्ह्याला किती मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. त्यावर विद्युत वितरण कंपनीने काय केले आणि पुढे काय करणार यावर विद्युत वितरण अधिकाऱ्यांचे मत ऐकून घेण्यात आले. जिल्ह्याला ५७५ मेगावॅट विजेची आवश्यकता आहे व आपल्याकडे ५०० मेगावॅट वीज उपलब्ध आहे. त्यावर जिल्ह्याचे काम चालू शकते, असे मत विद्युत महावितरणाचे अधिकाऱ्यांनी मांडले. मात्र तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी भारनियमन होत आहे, असा सवाल आमदारांनी उपस्थित केला. आमदारांनी आपआपल्या परिसरातील समस्या आवर्जून बैठकीत मांडल्या. वीज वितरणचे अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. एवढेच नव्हे तर स्वत: विद्युत महावितरणाच्या दारी जाऊन आपल्या समस्या माडंल्या. मात्र त्याकडेही लक्ष देण्यात आले नाही, अशी खंत त्यांनी बैठकीत व्यक्त केली. आमदारांच्याच समस्यांकडेच दुर्लक्ष केले जाते मग सामान्य नागरिकांच्या समस्या कश्या दूर होणार, असा सूर बैठकीत निघाला. शेतकऱ्यांच्या समस्या, शहरातील नागरिकांच्या वीज जोडणी तसेच वीज वितरणचे इनफ्रास्ट्रक्चर अशा एक ना अनेक मुद्यांवर घमासान चर्चा झाली. यावर विद्युत महावितरण अधिकाऱ्यांनी घोंगडे झटकण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळेपर्यंत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. अखेर विद्युत वितरणने वीज पुरवठ्याबद्दल उपाययोजना कराव्या, असे निर्देश खासदार अडसुळांनी दिले. (प्रतिनिधी)