शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

काटोल विधानसभा पोटनिवडणूक : भाजपात अनेक इच्छुक, मात्र अटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 21:44 IST

काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. पण इच्छुकांनी जिंकल्यास पुढील वेळी कायम ठेवण्याची अट घातली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित मानला जात आहे. पण खर्चाची गणितं आड येत आहेत. पोटनिवडणुकीत उमेदवारी दुसऱ्याला दिल्यास आणि उमेदवार जिंकल्यास निश्चित उमेदवार गोत्यात येण्याची भीती आहे. राज्यात भाजप-सेनेची युती झाल्याने शिवसेनेने उडी मारली आहे. पण भाजपाची दावेदारी जास्त आहे. काटोलमध्ये साडेतीन महिन्यासाठी कुणाला आमदार बनवायचे, हे राजकीय पक्षापुढे कन्फ्युजन आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीकडे नाही पर्याय : सेनेची भूमिका तळ्यात-मळ्यात : काटोलचे कन्फ्युजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. पण इच्छुकांनी जिंकल्यास पुढील वेळी कायम ठेवण्याची अट घातली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित मानला जात आहे. पण खर्चाची गणितं आड येत आहेत. पोटनिवडणुकीत उमेदवारी दुसऱ्याला दिल्यास आणि उमेदवार जिंकल्यास निश्चित उमेदवार गोत्यात येण्याची भीती आहे. राज्यात भाजप-सेनेची युती झाल्याने शिवसेनेने उडी मारली आहे. पण भाजपाची दावेदारी जास्त आहे. काटोलमध्ये साडेतीन महिन्यासाठी कुणाला आमदार बनवायचे, हे राजकीय पक्षापुढे कन्फ्युजन आहे.भारतीय जनता पक्ष नागपूर शहरातील उमेदवार काटोलमधून उभा करण्यास इच्छुक आहे. पण स्थानिक इच्छुकांनीही पक्षाकडे आपली इच्छा प्रदर्शित केली आहे. किंबहुना पक्षाच्या निर्णयाप्रति नाराजीही व्यक्त करीत सूचक इशाराही दिला आहे; सोबतच अटसुद्धा पक्षापुढे ठेवली आहे. दोन्ही निवडणुकीत खर्च करायला हरकत नाही. पण पोटनिवडणुकीत निवडून आल्यास पुन्हा संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती नसल्याने दोन्ही पक्षाचे उमेदवार येथे उभे झाले होते. पण भाजपाच्या आशिष देशमुखांनी विजय मिळविला होता. आता राज्यात सेना-भाजपाची युती झाली आहे. पण युतीत ही जागा शिवसेनेला जाते आहे. मात्र भाजपा २०१४ मध्ये निवडून आल्यामुळे भाजपाच्या इच्छुकांनी येथे दावा केला आहे. लोकसभेपूर्वी ही पोटनिवडणूक होत असल्याने शिवसेनेला मदत करावीच लागेल, असे त्यांना वाटते आहे. त्यामुळे २०१४ ला शिवसेनेला मिळालेली १४ हजार मतांवरही भाजपाच्या इच्छुकांचा डोळा आहे. हीच अपेक्षा शिवसेनेच्या इच्छुकांकडूनही व्यक्त होत आहे. शिवाय युतीत काटोलची जागा शिवसेनेला जात असल्याने शिवसेनेतूनही इच्छुकांची दावेदारी वाढली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीवरून खलबते सुरू आहे.आघाडीत मात्र काटोलमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार कायम राहणार आहे. पण साडेतीन महिन्यासाठी होणारा खर्च आणि परत ऑक्टोबरमध्ये लागणाऱ्या निवडणुकीत करावा लागणार खर्च, हे गणित राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी अवघड ठरते आहे. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला त्याशिवाय पर्यायच नसल्याचे सांगण्यात येत आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूकnagpurनागपूर