शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कर्नाटक-तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रातदेखील कायदा आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 21:28 IST

अनुसूचित जाती व अनुसूचित जाती विभागाचा निधी खर्च करण्यासंदर्भात कर्नाटक व तेलंगणामध्ये कायदा आहे. महाराष्ट्रातदेखील याप्रमाणे कायदा आणण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री नितीन राऊत यांनी केली.

ठळक मुद्दे‘एससी-एसटी’ विभागाच्या निधीसंदर्भात घोषणा : आदिवासी वसतिगृहे शासकीय इमारतींमध्ये आणण्यासाठी प्रयत्न

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अनुसूचित जाती व अनुसूचित जाती विभागाचा निधी खर्च करण्यासंदर्भात कर्नाटक व तेलंगणामध्ये कायदा आहे. महाराष्ट्रातदेखील याप्रमाणे कायदा आणण्यात येईल, अशी घोषणा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग मंत्री नितीन राऊत यांनी केली. विधान परिषदेत रवींद्र फाटक यांनी पालघरमधील आदिवासी मुलांच्या वसतिगृहासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते.अनुसूचित जाती व अनुसूचित जाती विभागाला शासनाकडून निधी देण्यात येतो. तो खर्च करण्यासंदर्भात कर्नाटक व तेलंगणामध्ये कायद्याच्या माध्यमातून नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे त्याप्रमाणे राज्यातदेखील कायदा आणला जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान आदिवासी वसतिगृहांच्या समस्यांबाबतदेखील विविध सदस्यांनी मुद्दे मांडले. राज्यातील अनेक आदिवासी वसतिगृहे ही भाड्याच्या इमारतींमध्ये सुरू आहेत. या वसतिगृहांना शासकीय इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजपचे सदस्य परिणय फुके यांनी केली. यावर अशा प्रकारचा प्रस्ताव विचाराधीन असून आदिवासी वसतिगृहे शासकीय इमारतींमध्ये आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन नितीन राऊत यांनी दिले.पालघर-डहाणूतील ७९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणारमहाविद्यालयांत प्रवेश घेऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला असूनदेखील पालघर व डहाणू तालुक्यातील ७९ आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्याची बाब रवींद्र फाटक यांनी सभागृहासमोर आणली. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असून त्यादृष्टीने लगेच पावले उचलली जातील, असे आश्वासन नितीन राऊत यांनी दिले. सद्यस्थितीत राज्यात अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी २८५ व मुलींसाठी २१० अशी एकूण ४९५ वसतिगृहे आहेत. यांची मंजूर क्षमता ५८ हजार ७९५ इतकी असून, त्यापैकी ५३ हजार ३५५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. शिवाय वसतिगृहांत प्रवेश न मिळालेल्या २० हजार विद्यार्थ्यांना ‘स्वयम्’ योजनेचा लाभ मिळू शकतो व या वर्षात ७ हजार ११९ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतVidhan Parishadविधान परिषद