लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या एक-दोन महिन्यापासून कन्हान नदीतील पाण्याची पातळी कमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहे. परिणामी कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्ध पाण्याचे पंपिंग ३० एमएलडी ने कमी झाले आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासून पूर्व व उत्तर नागपुरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. १ मार्च २०१९ रोजी नेहरूनगर झोन, लकडगंज झोन, सतरंजीपुरा झोन व आशीनगर झोनचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.साधारणपणे कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून दररोज १९० ते १९५ एमएलडी पाण्याचे पंपिंग होते. सध्या येथून १६० एमएलडी पंपिंग होत आहे. १२ फेब्रुवारी नंतर आता २८ फेब्रुवारीला पुन्हा कन्हान इनटेक वेलमधील पाण्याची पातळी खाली गेली आहे. मनपा-ओसीडब्ल्यू यांनी जलसंपदा विभागाकडे पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर नवेगाव-खैरी धरणातून पाणी सोडले आहे.कन्हान नदी उन्हाळ्यात कोरडी पडते. त्यामुळे शुद्धीकरणासाठी लागणारे अधिकचे पाणी धरणाच्या उजव्या कालव्यात सोडण्यात येते. उजव्या कालव्यापासून १९.४ किमी अंतरावर असलेल्या दरवाज्यातून पाणी सोडले जाते. हे पाणी कन्हान नदीत येते. २८ फेब्रुवारी रोजी सोडण्यात आलेले अधिकचे पाणी इनटेक वेलपर्यंत १ मार्च रोजी सायंकाळी पोहोचेल. यानंतर बाधित झालेला पाणीपुरवठा २ मार्च रोजी सकाळी सुरळीत होईल.११ व १२ फेब्रुवारी रोजी कन्हान नदीवरील पंपिंग काही काळासाठी बाधित झाले होते. यामुळे पूर्व व उत्तर नागपुरातील पाणीपुरवठा बाधित झाला होता. तसेच या भागातील काही वस्त्यांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची ओरड आहे. टंचाई विचारात घेता पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
कन्हानची पातळी घटली : पूर्व व उत्तर नागपुरात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:52 IST
गेल्या एक-दोन महिन्यापासून कन्हान नदीतील पाण्याची पातळी कमी होण्याच्या घटना वारंवार घडत आहे. परिणामी कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील शुद्ध पाण्याचे पंपिंग ३० एमएलडी ने कमी झाले आहे. यामुळे गेल्या काही दिवसापासून पूर्व व उत्तर नागपुरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. १ मार्च २०१९ रोजी नेहरूनगर झोन, लकडगंज झोन, सतरंजीपुरा झोन व आशीनगर झोनचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.
कन्हानची पातळी घटली : पूर्व व उत्तर नागपुरात पाणीटंचाई
ठळक मुद्देजलशुद्धीकरण केंद्राला अपुरा पुरवठा