कन्हान-बुटीबोरी पॅसेंजरला मध्य रेल्वेचा ‘ब्रेक’

By Admin | Updated: January 28, 2015 01:01 IST2015-01-28T01:01:08+5:302015-01-28T01:01:08+5:30

शहराची वाढती लोकसंख्या, आजूबाजूच्या गावातून नोकरीनिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कन्हान-बुटीबोरी दरम्यान फास्ट पॅसेंजरची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. दपूम रेल्वेच्या

Kanhan-Butibori passenger gets a break from Central Railway | कन्हान-बुटीबोरी पॅसेंजरला मध्य रेल्वेचा ‘ब्रेक’

कन्हान-बुटीबोरी पॅसेंजरला मध्य रेल्वेचा ‘ब्रेक’

‘अपडाऊन’ करणाऱ्यांची गैरसोय : दहा महिन्यांपासून पत्रावर उत्तर नाही
नागपूर : शहराची वाढती लोकसंख्या, आजूबाजूच्या गावातून नोकरीनिमित्त येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कन्हान-बुटीबोरी दरम्यान फास्ट पॅसेंजरची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. दपूम रेल्वेच्या विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. परंतु नागपूर ते बुटीबोरी हा भाग मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने मध्य रेल्वेला १० महिन्यापूर्वी याबाबत एक पत्र दिले. या पत्रावर मध्य रेल्वेने कुठलाच निर्णय न घेतल्यामुळे या प्रकल्पालाच ‘ब्रेक’ लागला आहे.
नागपुरातून दररोज ५ हजार प्रवासी नोकरीनिमित्त शहरातून बाहेर जातात. तेवढेच लोक नोकरीसाठी शहरात येतात. परंतु त्यांच्या येण्याजाण्याची सुविधा नाही. बुटीबोरीत मोठी औद्योगिक वसाहत आहे. सोबतच मिहान आणि कार्गो हबचे कामही जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत कन्हान, कामठीवरून अनेक लोक नोकरीसाठी नागपूर आणि बुटीबोरीला जातात. त्यांना ये-जा करण्यासाठी रस्ते वाहतुकीची साधने कमी आहेत. या मार्गावर ५ ते ६ डब्यांची फास्ट पॅसेंजर कन्हान-बुटीबोरी दरम्यान चालविल्यास अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची सुविधा होणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण डबली यांनी सूचना केल्यानंतर तत्कालीन दपूम रेल्वेचे डीआरएम वर्मा यांनी त्यास मंजुरी दिली होती. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने मध्य रेल्वेला १० महिन्यापूर्वी याबाबत पत्रही दिले. परंतु या पत्रावर मध्य रेल्वेने कुठलीच भूमिका घेतलेली नाही. कन्हान-बुटीबोरी पॅसेंजर चालविण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कन्हान, कामठी, कळमना, इतवारी, नागपूर, अजनी, खापरी, बुटीबोरी रेल्वेस्थानकावर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. रेल्वे प्रशासनाने ठरविल्यास १० दिवसात ही पॅसेंजर सुरू होऊ शकते. परंतु रेल्वे अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे या प्रकल्पाला ब्रेक लागल्याची स्थिती आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Kanhan-Butibori passenger gets a break from Central Railway